<
जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतिने विधी शाखेचा मास्टर ऑफ लॉ ( एल एल एम ) अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी सोबतच मराठी भाषेत प्रशपत्रिका अभ्यास क्रम मिळावा अशा मागणीच्या आशयाचे निवेदन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु यांना आज रोजी देण्यात आले आहे.
यावर विद्यापीठा कडून ही अनुकूल प्रतिसाद मिळाला असून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले असल्याचे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी कळविले आहे.
मुंबई विद्यापीठात देखील महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पाठपुराव्या नतंर एल. एल. एम. विधी अभ्यासक्रम हे मराठी मध्ये लागू करण्यात आले आहे.
परंतु महाराष्ट्रातील इतर सार्वजनिक विद्यापीठांमध्येही विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना ह्याच प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन संघटेच्या वतीने प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरु महोदय यांना पत्रव्यवहार करून विधी शाखेच्या अभ्यास क्रमांमध्ये इंग्रजी सोबत मराठी भाषेत प्रश्नपत्रिका मिळणे बंधन कारक करावे ही मागणी आम्ही करित आहोत, यावर विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर आम्हाला या मागणीसाठी आंदोलन करावे लागेल असेही जिल्हाध्यक्ष यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले आहे.
याच बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षा उत्तरपत्रिका रीचेकिंगसाठी अर्ज भरले आहेत त्यांचे निकाल ही लवकर लावावे यासाठी देखील यावेळी चर्चा झाली असल्याचे सांगीतले व तो निकाल ही लवकरच लागेल असे विद्यापीठा कडून चर्चा करतांना सांगण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देतांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड दिपक सपकाळे, जिल्हाअध्यक्ष रोहन महाजन, सोबत पदाधिकारी पवन पाटील, ॲड मानसी मेढे, शुभम गीते, प्रथमेश मराठे, सूरज जाधव, हितेश पाटील, उपस्थित होते.