<
जळगाव – (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सव या नृत्यगीतांची स्पर्धा गेल्या वीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे २१ वे वर्ष साजरे होत असून, कोरोना कालावधीत देखील याचे आयोजन ऑनलाईन स्वरुपात करण्यात आले होते. कान्हदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. महिलांच्या आत्मीयतेचा आणि सर्वात प्रिय असलेला हा सोहळा शनिवार, दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे सकाळी १० ते ६ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. ही स्पर्धा तीन गटात होत असून प्रत्येक गटात १२ ते १५ मुलींची संख्या असते. यात भुलाबाईच्या गाण्यांना अग्रक्रम देण्यात येतो मात्र सध्याच्या चालू घडामोडींवर समाजोपयोगी संदेशाची पेरणी महिला करतात. अशा गाण्यांना प्राधान्य देवून भुलाबाई महोत्सव हा समाजप्रबोधनाचे एक व्यासपीठ म्हणून प्रस्थापित करण्यात प्रतिष्ठानला यश प्राप्त झाले आहे.
भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. यानिमित्ताने सायंकाळी मुली एकत्रित येवून भुलाबाईचे गाणे गात घरोघरी हिंडायच्या यातून एकमेकींचे नाते आणि एकोपा वाढण्यास मदत होत असे तर भुलाबाईच्या गाण्यातून एक सशक्त, सुसंस्कृत परिवाराची जडण – घडण करण्यात महिलांना बळ मिळत होते. परंतु आधुनिक युगात हा संवाद लोप पावत आहे आणि या लोकपरंपरेस उतरती कळा लागली आहे. अशा स्त्री केंद्रित उत्सवाचे महत्व जाणून स्व. डॉ. अविनाश आचार्य यांनी भूलाबाई महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या निमित्ताने शाळा महाविद्यालय आणि खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. यात विजेत्यांच्या प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येते. महोत्सव यशस्वितेच्या कार्यालय, प्रमुख पाहुणे, सूत्र संचालन, परिक्षक, व्यासपीठ, नोंदणी, खाऊ वाटप, बैठक व्यवस्था, वेळ नियोजन आदि समित्यांचे गठण करण्यात आले आहे. समितीमध्ये जळगाव शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश आहे.
भुलाबाई महोत्सव हा विशेषतः महिलांसाठीचा एक पारंपारिक उत्सव आहे. याच्या नियोजन समित्यांमध्ये देखील महिलांचा सहभाग असतो. त्या समित्या पुढील प्रमाणे..
यावर्षीच्या भुलाबाई महोत्सव प्रमुख – सौ. रेवती कुरंभट्टी
कार्यालय समिती – मनिषा खडके, साधना दामले, मीना जोशी, वैशाली पाटील प्रमुख पाहुणे – स्वाती फिरके, संगीता अट्रावलकर, प्रांजली रस्से, रेवती शेंदुर्णीकर सूत्र संचालन समिती – प्रतिमा याद्निक, मीना जोशी, वैदेही नाखरे, प्रिती झारे, सानिका पंचभाई परिक्षक समिती – अनिता वाणी, वंदना पाटील, विद्या कलंत्री, संध्या पाटील व्यासपिठ समिती – स्वाती महाजन, अंजली हांडे नोंदणी समिती – रेखा कुळकर्णी, राजश्री डोल्हारे, अपर्णा पाटील, चारुलता पाटील खाऊ वाटप – सुनिता पाटील, देवयानी कोल्हे, रेखा पाटील, अलका सोनवणे, राजश्री रावळ बैठक व्यवस्था – वैशाली पाटील, स्नेहा तायडे, माहेश्वरी येवलेकर, प्रतिमा शिंपी वेळ नियोजन – पियुष रावळ, सुनिता कोत्तावार, प्रिती झारे सुकाणु समिती – रत्नाकर पाटील, पियुष रावळ, मनिषा खडके, रेवती कुरंभट्टी. सागर येवले, प्रतिमा याद्निक.