<
जळगाव – (प्रतिनिधी) – राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तर व ग्राम पंचायत विकास आराखडा लोकसहभागाने तयार करावा व काळजीपूर्वक नियोजन करावे, असे आवाहन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिकेत पाटील यांनी केले.
शाश्वत विकास ध्येय अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्यन इको रिसोर्ट येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जळगाव नगरीचे आमदार मा.श्री राजूमामा भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होते. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत असताना आ.राजूमामा भोळे यांनी सागितले कि गावाचा विकास करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या योजनाचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला करून द्यावा या साठी आपल्या काही अडचण असतील तर त्या आपण शासन स्तरावर सोडवू , पण आमच्या ग्रामीण भागातील शेतकरयाना योजनाचा जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल व ग्रामीण भागात आरोग्या बाबत काही योजनाचा गाव विंकास आराखडा तयार करत असताना आपण काही योजना समाविष्ट करू शकतो का याचा आपण विचार करावा असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन यशदा पुणे येथील प्रशिक्षक प्रशिक्षक सुनील वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण प्रशिक्षक श्री ,भूषण लाडवंजारी यांनी केले या कार्यक्रमास यशदाचे प्रवीण प्रशिक्षक श्री सागर धनाड,सुनील अहिरराव,शिर्के अण्णा उपस्तीत होते यांनी सन २०२३-२४ या वर्षाचे आराखडे तयार करण्यासाठी शाश्वत विकास ध्येय शाश्वत विकास ध्येय मधून समतोल विकास साधला जाईल, आपला आराखडा सर्व समावेशक कसा होईल याबाबत मागदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमा यशस्विते साठी सौ.लीना वाघोदेकर,श्री रोहन वाडीले,श्री दीपक शिंपी,श्री अभिषेक वाणी ,श्री प्रदीप बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.