<
जळगाव – (प्रतिनिधी) – के सी ई चे आय एम आर ने खान्देशातील पहिली एन बी ए अक्रीडेटेड एमबीए प्रोग्रामसाठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणुन मान्यता प्राप्त केली आहे. संस्थेकडुन के सी ई च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मिळवलेली ही विशेष उपलब्धी आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशन, हे बोर्ड- ऐ आय सी टी च्या अंतर्गत काम करते. उच्च तंत्र शिक्षणात उच्च गुणवत्ता आणि दर्जा याचा मापदंड म्हणुन या अॅक्रिडेशनला अत्यंत महत्व आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बेस्ट प्रॅक्टीसेस आपल्या संस्थेत आहेत की नाही हे येणारी कमीटी चेक करते . आय एम आर ला व्हिजीट केलेल्या कमिटीत हिमाचल विद्यापिठाचे कुलगुरु प्रा सुनिल कुमार गुप्ता,प्रा डॉ दिपक टंडन, आय एम, दिल्ली हे शिक्षण तज्ञ होते.
या मान्यतेमुळे आता महाराष्ट्रातील टाॅप मॅनेजमेंट संस्थांच्या रांगेत के सी ई आय एम आर ने आपले स्थान निर्माण केले आहे. तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेमधुन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी हे औद्योगिक जगतात लागणारे कौशल्यप्राप्त आहेत ह्याची पडताळणी करणारी हि एक यंत्रणा आहे. हि यंत्रणा नियंत्रित केली जाते ती जनरल काॅन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह कमीटी मार्फत. आऊटकम बेस शिक्षणप्रणाली तपासण्यासाठी वाॅशिंग्टन या जागतिक पातळीवरील शिक्षण प्रणालीचे मापके वापरली जातात.
अश्या प्रकारच्या कठीण तपासणी यंत्रणेला सामोरे जाऊन अॅक्रिडेशन मिळवणारी आय एम आर हि खान्देशातील पहिली व्यवस्थापन संस्था आहे. संस्थेच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून केसीई चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे याच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या ॲकेडेमिक डीन डॉ तनुजा फेगडे, एन बी ए कोआॅडरडिनेटर डॉ पराग नारखेडे आणि आय एम आर प्राध्यापकांच्या टिमचे अभिनंदन केले जात आहे.अशी महिती यावेळी पत्रकार परिषेदेत प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी दिली यावेळी के सी ई चे जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार ,डॉ पराग नारखेडे , ॲकेडेमिक डीन डॉ तनुजा फेगडे,डॉ.शमा सुबोध उपस्थित होते.