<
जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23- जातीचे प्रमाणपत्र देतांना संबंधीत अधिका-यांनी योग्य ती काळजी घ्यावी. जसा कोणावर अन्याय होणार नाही या दृष्टीकोणातून काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देताना योग्य त्या कागदपत्रांची आपण पडताळणी केली आहे किंवा कसे याबाबत अधिका-यांनी जागृत रहावे, असे प्रतिपादन जात पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री. गुलाबराव खरात यांनी येथे केले. सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हयातील संबंधीत अधिका-यांची कार्यशाळा आज मा.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालना शेजारील मिटींग हॉल मध्ये झाली.
श्री. गुलाबरावजी खरात अध्यक्षस्थानी होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त, राकेश पाटील, तसेच जळगांव जिल्हयातील उपविभागीय अधिकारी भुसावळ श्री. रामसिंग सुलाणे उपविभागीय अधिकारी जळगांव श्री. महेश सुधळकर, उपविभागीय अधिकारी एरंडोल विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी अमळनेर श्रीमती सीमा अहिरे, उपविभागीय अधिकारी चाळीसगांव श्री. लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय अधिकारी पाचोरा, श्री. विक्रम बांदल, उपविभागीय अधिकारी फैजपुर श्री. कैलास कडलग, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राहूल पाटील तसेच त्यांचे कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री.गुलाबराव खरात यांनी अधिका-यांशी संवाद साधला जातीचे प्रमाणपत्र देताना आपण आवश्यक ती जबाबदारी घेतली पाहीजे. जातीचे नावे नावांमधील साधर्म्य कोणत्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. कोणत्या समाजाबददल कागदपत्रांची उपलब्धता नसतांना कोणते दाखले विचारात घ्यावेत. जातीचा उल्लेख अनेकदा शैक्षणीक कागदपत्रात नसतो त्यावेळी कोणत्या कागदपत्रांचा उपयोग करावा. यासह विविध मुद्द्यावर विश्लेषण करण्यात आले.
सहभागी अधिकारी कर्मचा-यांनी शंकाचे निरसन करुन घेण्याचा प्रयत्न केला. उपायुक्त राकेश पाटील यांनी प्रस्तावीक केले. तसेच एम. जे. महाविदयालय जळगांव येथे सन 2022-23 या वर्षात इयत्ता 11 वी 12 विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत श्री. राकेश पाटील, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी मार्गदर्शन केले तसेच 11 वी 12 वी विज्ञान महाविदयालयाच्या प्राचार्य तसेच कनिष्ठ लिपीक, यांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाबाबत उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राकेश पाटील, जळगाव यांनी मार्गदर्शन केले.