<
भडगाव ता.प्रतिनिधी तालुक्यातील कजगांव येथील बस स्थानक समोरील अतिक्रमण दि.२७ रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले अतिक्रमण धारकांनी स्वताच आपले अतिक्रमण काढुन घेतले या मुळे बस स्थानक आवारात मोकळा श्वास घेतल्याने नागरिकान मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कजगाव येथील बस स्थानका समोरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणी साठी कजगांव येथील भुषण पाटील यांनी गेल्या वीस दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता या मागणीचा विचार करत कजगाव बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्या बाबत हालचाली सुरू झाल्यानंतर दि.२७ रोजी बस स्थानक समोरील अतिक्रमण काढण्यात आले.
अतिक्रमण काढण्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त कजगाव येथे पोहचल्या नंतर अतिक्रमण धारकांना बारा वाजे पर्यंत अतिक्रमण काढुन घेण्याचे सांगितले त्या प्रमाणे अतिक्रमण धारकांनी स्वत हून आपले अतिक्रमण काढुन घेत बस स्थानक समोरील पटांगण मोकळे केले.
पोलिसांचा मोठा फौजफाटा
बस स्थानक चं अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता यात भडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक,चंद्रसेन पालकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, ए.एस.आय राजेंद्र पाटील, ए.एस.आय कैलास गिते ,हवालदार जिजाबराव पवार,पोलिस नाईक नरेंद्र विसपुते,हवालदार पंचशिला निकम,हवालदार शमिना पठाण , ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन,विस्तार अधिकारी बी एन पाटील ,ग्रमपंचायत कर्मचारी संजय पाटील, लिपिक, सुनील पवार,शिपाई रविंद्र माळी,व मनोज सोनावणे, रघुनाथ पाटील,जाकिर मन्यार जळगाव येथील दंगा नियंत्रक पथक कजगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी,भडगाव, चाळीसगाव शहर,चाळीसगाव ग्रामीण या पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी असे चाळीस पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा समावेश होता अतिक्रमण हटाव प्रसंगी नागरिकांची बघ्याची मोठी गर्दि बस स्थानक चौकात जमली होती.