<
जळगाव – (प्रतिनिधी) – आज आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कार्यालयाच्या सभागृहात माहिती अधिकार अधिनियम-२००५ प्रभावीपणे राबविण्या कारिता ॲड. दिपक सपकाळे यांनी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम – २००५ या विषयावर व्याख्यन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात माहिती अधिकार अधिनियम-२००५ त्याची व्याप्ती व माहिती अधिकार अधिनियम – २००५ मधिल कलम – ४ ख ची माहिती याबाबत सविस्तर माहिती दिली. व त्याबाबत कर्मचाऱ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येऊन आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी ॲड. दिपक सपकाळे यांनी सांगितले की माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ कायद्यातील कलम – ४ ख ची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजे अर्जदारांना माहिती मिळण्यासाठी सोईचे होईल व प्रशासनात पारदर्शकता येईल.
सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले इंजि श्री एस बी रुपनर उपकार्यकारी अभियंता तथा माहिती अधिकारी तसेच इंजि.श्री जी. आर. सूर्यवंशी उप अभियंता, श्री संजय पाटील प्रथम लिपिक व संबधित विभाग प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.