<
जळगांव(प्रतिनिधी)- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धांच्या प्राथमिक फेरीचे आयोजन आज अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सुमारे २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरू वंदना सादर केली. स्पर्धेच्या नियम व अटी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी विशद केल्या. प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून दृश्यंत जोशी, रश्मी कुरंभट्टी व सुदीप्त सरकार हे होते. स्पर्धेच्या समरोपाप्रसंगी कार्यकारी विश्वस्थ दीपक चांदोरकर यांनी आभार प्रदर्शन केले. परीक्षकांच्या वतीने जोशी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यंदाच्या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते. या प्राथमिक स्पर्धेत धनश्री जोशी, व प्रियांका पाटील, नाहटा कॉलेज भुसावळ, स्वरमयी देशमुख, एम जे कॉलेज, जळगाव आणि सुरज बारी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची निवड होऊन हे विजेतेअंतिम स्पर्धेसाठी मुंबई येथे जातील.