<
जळगाव – (प्रतिनिधी) – जळगाव शहरांमधील विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतात. सकाळी वेळेवर बस उपलब्ध होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असून. विद्यापीठ हे शिक्षणाचे मुख्य केंद्र बिंदू आहे. पण बस सेवे अभावी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जळगाव येथुन सकाळी ९:३० वाजता एक बस व दुपारी १२:०० वाजता व संध्याकाळी परत येण्याकरीता ४:०० वाजता व ५:३० वाजता बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन विद्यापीठ कमेटीचे अध्यक्ष योगेश माळी यांच्या मार्फत करण्याली आहे.
आगार प्रमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे देखील स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. निवेदन देते वेळी मासु जिल्हाअध्यक्ष रोहन महाजन, मासु विद्यापीठ कमेटी अध्यक्ष योगेश माळी, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख संघटक ऋतिक महाले प्रविण शिंदे हे उपस्थित होते.