<
जळगांव(प्रतिनिधी)- स्वर्गीय वसंतराव चांदोरकर जन्मशताब्दीनिमित्त यांची मुंबई व स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मल्हार’ कार्यक्रमाचे आयोजन आज रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता कांताई सभागृह येथे भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले. प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री मयूर पाटील यांनी गुरु वंदना सादर केली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्री दीपक चांदोरकर यांनी केले.
आजची कलावंत सोनल शिव कुमार हिचे स्वागत सौ दीपिका चांदोरकर यांनी केले तर संवादिनी वर साथ करणाऱ्या सुप्रिया जोशी व तबल्यावर साथ करणारे पुष्कराज जोशी यांचे स्वागत दीपक चांदोरकर यांनी केले व यानंतर सुरू झाला तो सुरेल मल्हार प्रवास सोनल शिवकुमार यांनी सर्वप्रथम राग भूप मांडला विलंबित तीन तालात निबध बडा ख्याल एरी आज भलईका सादर केला द्रुत एकताल सखी आज रिजायो सादर केली. त्यानंतर राग केदार मध्ये मध्यलय झपतालात “मालनीया सज चली” रसिकांना सुखावून गेली लागोलाग सोनलने द्रुत तीन तालात बंदिश ये नवेली नार सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. माणिक ताई भिडे यांनी स्वरबद्ध केलेला रूप पाहता लोचनी हा अभंग सादर करून आजच्या मल्हार मैफिलीचा समारोप केला कार्यक्रमाचे निरूपण आकाशवाणीच्या सौ. रश्मी कुरंभट्टी यांनी केले तर आभार श्री दीपक चांदोरकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी मयूर पाटील, जुईली कलभांडे, वरूण देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.