<
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ताम) , मुंबई च्या प्रवीण साळुंके, मिलिंद पठारे यांना मतदानाचा अधिकार
औरंगाबाद : नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गेल्या चार महिन्यांपासून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) मार्गदर्शनाखाली तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (टीएफआय) या राष्ट्रीय महासंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत 36 राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्यातून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई (ताम) या अधिकृत संघटनेचे अध्यक्ष प्रवीण साळुंखे व महासचिव मिलिंद पठारे यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून अध्यक्ष प्रवीण साळुंके, महासचिव मिलिंद पठारे व कोषाध्यक्ष विनायक गायकवाड यांची तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ( ताम) संघटनाच अधिकृत असल्याचा पुन्हा एकदा शिक्का मोर्तब झाला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये तायक्वांदो खेळात दोन फेडरेशन व महाराष्ट्रातही दोन संघटना तयार झाल्या होत्या. 28 एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया हीच अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे जाहीर करून निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टीएफआयच्या निवडणुकीसाठी अधिकृत मतदार राज्य संघटना निश्चित करण्याचे काम चार महिन्यांपासून ऑलिम्पिक भवन, नवी दिल्ली येथे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सस्तानी यांच्या समोर सुरू होते. शुक्रवारी (दि.28) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, टीएफआयची मतदार यादीही जाहीर करण्यात आली. 14 नोव्हेंबर रोजी निवडणुकीतून टीएफआयची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील अधिकृत राज्य संघटना व खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
मतदार अर्ज दाखल करणे – 30 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 30 आक्टोबर ते 1 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेणे – 4 नोव्हेंबर
उमेदवारांना चिन्ह वाटप- 7 नोव्हेंबर
निवडणूक – 14 नोव्हेंबर
निवडणुकीचा निकाल- 14 नोव्हेंबर