<
लोहारा ता.पाचोरा ( ईश्वर खरे ) येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वाघूर धरणावरून जल जीवन मिशन योजने अंतर्गत मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्च्छता तथा पालकमंत्री जळगाव यांनी मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेला सन २०२१ मध्ये मंजुरी देऊन निविदा निधून योजनेचे काम देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली परंतु सदर निविदा च्या अंदाजपत्रिक्यांच्या किंमतीपेक्षा जास्तीच्या असल्याने सदर निविदा तांत्रिकदृष्ट्या स्वीकारण्यात आल्या नाही.
सदर योजनेच्या अंदाजपत्रकाचे दर हे जुने असल्याने झालेली भाववाढ पाहता सदर योजनेचे सुधारित नवीन अंदाजपत्रक तयार करून दि.१८/०४/२०२२ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली त्यानंतर योजना ही १६६४८२८८८/- रुपये किमतीची झाली. सदर योजनेची निविदा महाराष्ट्र जीवन प्रधिकरण विभाग जळगाव यांनी प्रसिद्ध करून मागवण्यात आल्या. त्यामध्ये श्री. जी. एस. आर कन्स्ट्रक्शन व लक्ष्मी कन्स्ट्रक्शन पाचोरा यांच्या कमी किमतीची निविदा असल्याने त्यांना दि. १८/१०/२०२२ रोजी सदर योजनेचे काम तात्काळ सुरू व्हावे म्हणून पाचोरा व भडगांव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांनी भरपूर प्रयत्न केले तसेच या योजनेचा पाठपुरावा वेळोवेळी माजी.जी.प. सदस्य शिवसेना गटनेता श्री. रावसाहेब पाटील, श्री. दिपकसिंग राजपूत श्री. अरुण पाटील यांनी केला सदर योजना लवकर व्हावी म्हणून लोहारा ग्रामपंचायतील सदस्य ही सदैव आग्रही होते योजनेचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर गावाच्या वतीने मा. श्री. गुलाबरावजी पाटील ह्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सरपंच अक्षय जैस्वाल, उपसरपंच आबा चौधरी, ग्रा. पं. सदस्य ईश्वर देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल दादा जाधव ग्रा. पं. सदस्य अशोक क्षीरसागर, अर्जुन पाटील, सुरेश मोरे यांनी जावून आभार मानले व सरपंच अक्षय जैस्वाल यांनी वाघूर धरणावरील पाइपलाइन झाल्यावर लोहारा गावाचा पिण्याचा पानाच्या प्रश्न कायस्वरुपी मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.