<
बोदवड-(ता. प्रतिनिधी-राजेंद्र शेळके) – तालुक्यात येवती येथे लम्पि आजाराचा कहर थांबेना आठ दिवसात येवती येथेे पुन्हाएका बैलाचा मृत्यू झाला आहे.
जामठी येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांवीना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.
येवती येथील राजेंद्र समाधान शिंदे यांचा अठरा वर्षाचा बैल हा पंधरा दिवसापासून बाधित होता वारंवार ता.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साखरे यांना भ्रमण द्वारे संपर्क करूनही डॉक्टर उपचार करण्यास यायला तयार नव्हते.
जामठी येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून डॉक्टरांची कमी आहे डॉक्टर नसल्यामुळे पशुधन शेतकरी हे चिंतेत सापडलेले आहे. जामठी पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत दहा गावांचा समावेश आहे तरीसुद्धा दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नाही. शेतकरी पशुधनांचा उपचार खाजगी डॉक्टरां मार्फत करून घेत आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्याला पशुधनमालकां कडून डॉक्टरांची मागणी होत आहे. दरम्यान तालुक्यामध्ये आत्तापर्यंत ११५६ बाधित असल्याचे सांगण्यात आले तर ९० जनावरांचा मृत्यू झाल्याचे डॉ. दीपक साखरे यांनी माहिती दिली.