<
जामठी-(राजेंद्र शेळके) – स्वामित्व योजनेअंतर्गत ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र सर्वे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि भूमि अभिलेखन कार्यालय मार्फत महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात ड्रोन सर्वेचे काम संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सर्वे केला असून ८०%पूर्ण झालेला आहे. त्यात फक्त मुक्ताईनगर व बोदवड तालुका बाकी आहे. दरम्यान आज बोदवड तालुक्यातील जलचक्र खु. येथून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ह्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, बोदवड नगरपंचायत चे नगराध्यक्ष आनंदा पाटील, विधानक्षेत्र प्रमुख सुनील पाटील, सईद बागवान,दीपक माळी इत्यादी उपस्थित होते.
ही योजना राबवत असताना बोदवड तालुक्यातील सर्व महसुली गावांमध्ये सदर योजना अमलात येणार आहे. शासन दरबारी जास्त जमीन बाबतचे वाद असल्याने तसेच बऱ्याच गावांना (ज्या गावांना नगर भूमापण लागू नाही) गावचे नकाशे व अभिलेख उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या हद्दीतील मिल्कतिची घराची एकसूत्रता आणण्यास सदर योजनेमुळे मदत होते. प्रत्येक गावातील घर रस्ते शासकीय मिळकती यांचा स्वतंत्र नक्शा तयार होऊन प्रत्येक मिळकतीचे (प्रॉपर्टी कार्ड) स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार होणार आहे.
यावेळी व्ही. एम. सोनवणे उप अधीक्षक भूमि अभिलेख बोदवड , गट विकास अधिकारी हेमंत कुमार काथेपुरे बोदवड, ग्रामसेवक गोविंद राठोड जलचक्र खुर्द, ऋतू राज सोनवणे,सर्वे ऑफ इंडिया ड्रोन पायलट ज्ञानेन्द्र यादव, एन. सी.सुर्यवंशी मचख्यालय सहाय्यक उप अ.भुं.अ.बोदवड, वकर्मचारी टीम उपस्थित होते.
“सदर योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मधील मिळकतीचे वाद मिटवण्यात तसेच बांधकाम परवानगी घेण्यासाठी सुलभ होईल, मिल्क तिची पत वाढण्यास मदत होईल, ग्रामस्थांना सदर मिळकतीवर कर्ज घेणे सुलभ व सोपे होईल, गावातील मालकी हक्काचे वाद उद्भवणार नाही, तसेच मिळकत धारकांना मिळकतीची प्रॉपर्टी कार्ड चतुरसिमेसह नकाशा तयार करून देण्यात येईल. यासाठी लागणारा सर्व खर्च हे महाराष्ट्र शासन करणार आहे”.
तरी दरेक गावातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले. व्ही. एम. सोनवणे उप अधीक्षक भूमी अभिलेख बोदवड यांनी सांगितले.