<
जळगांव(प्रतिनीधी)- आज आपण बघतच आहोत आधुनिक तंत्रज्ञानाने किती प्रगती केली आहे. आपण तिचा आज किती गैरवापर करत आहोत. त्यातलंच एक उदाहरणं म्हणजे ‘मोबाईल’. या मोबाईल च्या आती वापरामुळे नात्यातील आत्मीयता संपत चालली आहे. मनुष्याला विविध आजार जडत आहेत. तो त्याच स्वतःच काल्पनिक विश्व बनवून त्यात एकटा होत चालला आहे. यावर जनजागृती होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक मनोज भालेराव यांनी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर विदयार्थ्यांच्या साहाय्याने विविध जनजागृती विषयक चित्रे,घोष वाक्य तसेच माहिती लिहून पोस्टर्स बनवली आणि त्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व मोबाईलचा अतिवापर कमी करणे असा निश्चय विद्यार्थ्यांना कडून करून घेतला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे शिक्षक रमेश ससाणे, पंकज नन्नवरे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.