<
जळगाव दि.13- युनिसेफ व एस बी सी 3 च्या सहयोगाने रेडिओ मनभावन 90.8 एफ. एम. ने ग्रामपंचायत वावडदा येथे, बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बालविवाहचे परिणाम त्या निरागस मुलीला भोगावे लागतात ज्या वयात तिला शिकायचं असत अश्या वयात लग्न करणे म्हणजे कायद्याने गुन्हातर आहेच पण एक पिढी बरबाद होते त्याचे जबाबदार कोण? असा प्रश्न येवलेकर जिल्हा समन्वयक चाईल्ड लाईन,जळगाव यांनी उपस्थित करताच काही क्षण शांतता पसरली होती. सावित्रीबाई चे फोटो फक्त जयंती पुण्यतिथी साठीच वापरायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. क्रांती एका दिवसात घडत नसते. सावित्री च्या तुम्ही लेकी आहात तेव्हा संकल्प करा या पुढे मुलीचे वय 18 च्या समोर व मुलाचे वय 21 असल्याशिवाय लग्न होऊ देणार नाही आपलं गाव या विचाराला धरून एकजूट करा असं आवाहन त्यांनी उपस्थिती स्त्री पुरुषांना केल.
या प्रसंगी रेडिओ मनभावन चे केंद्र प्रमुख अमोल देशमुख ह्यांनीरेडिओ मनभावन केंद्र समाजाच्या समस्या कश्या प्रकारे मांडत आणि जनजागृती कशी केली जाते यावर प्रकाश टाकला व या कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. वावडदा गावचे सरपंच राजेश वाडेकर म्हणाले की रेडिओ मनभावन अल्पवधीत प्रसिद्ध झाले असून समाज मनाचा ठाव घेत आहे मागील 2-3 महिन्यापासून मी पाहतोय रेडिओ च्या माध्यमातून बालकांचे गर्भवती, स्तनदा मातांचे प्रश्न व त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून होते आहे ही समाजासाठी एक संधी आहे.
मागील 2 वर्षांपासून वावडदा गावात बालविवाह होत नाहीत व पुढेही होऊ नयेत म्हणून आम्ही वावडदावासी प्रयत्न करत राहू आणि यशस्वी होऊ हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंगलाबाई गोपाळ, प्रतिभा शिंदे,मीना पवार यशोदा वाघ,राजू शिंदे, कांबळे गुरुजी, सरुबाई जाधव,अनिता धनगर,अरुणा मस्के, प्रतिभा शिंपी,यशोदा वाघ, मीना पवार, शोभा जाधव, संजय राऊत, रवींद्र चिंचोले, दीपक मस्के, विजय पवार, सुभाष गोपाळ, सुमित पाटील,भानुदास भोमा पाटील,आदी आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश वाडेकर सरपंच आणि अमोल देशमुख केंद्रप्रमुख रेडिओ मनभावन यांनी प्रयत्न केले.