<
लोहारा ता. पाचोरा (रिपोर्टर ईश्वर खरे) कासमपुरा शिवारातील शेतात बांधलेल्या वासरीवर बिबट्याने हल्ला करुन तिचा फडशा पाडल्याची घटना दि. ९ नोव्हेंबर च्या रात्री घडली असून वनविभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी लोहारा व कासमपुरा येथील शेतकऱ्यानी केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, लोहारा येथील शेतकरी संतोष बळीराम डाम्बंरे यांचे लोहारा कासमपुरा शिवारात शेत (गट नं १४९) असुन त्या ठिकाणी त्याचा गुरांचा गोठा आहे. त्यांनी नेहमी प्रमाणे दि. ९ रोजी संध्ुयाकाळी दिवसभराचे कामे आटोपून एक म्हैस व एक मोठी वासरी बांधुन चारा टाकून घरी आले शेतात कापुस वेचणीचे काम सुरू असल्याने ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता शेतात गेले असता त्याना बिबट्याने वासरीचा फडशा पाडल्याचे दिसले तर ते दृश्य बघून बांधलेल्या म्हशीने देखील दोर तोडण्याचा प्रयत्न केल्याचे दृश्य दिसले संतोष जाधव (टेलर) यांच्या शेता जवळ काही शेतकऱ्यानी बिबट्याला बघितल्याचे सांगितले त्या अगोदर दि. १५ आक्टोबर रोजी देखील पहाटे शनिवारी असल्याने शिरसाळा येथील हनुमानाच्या दर्शनाला चारचाकी वाहनाने जाणाऱ्या लोहारा येथील भाविकांना बिबट्या दिसला होता व त्यावेळी त्यांनी गाडीत बसून त्याचा व्हीडिओ देखील बनवुन सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
एवढे होउन देखील वनविभाग बिबट्याला पकडण्याच्या तयारी दिसत नसल्याने शेतकऱ्या मध्ये वनविभागा बद्दल नाराजी पसरली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बिबट्याच्या धास्ती मुळे मजुर देखील कापुस वाचायला यायला तयार होत नाहीत . तसेच बिबट्याच्या धास्ती मुळे शेतकरी रात्री शेताकडे जात नसल्याचा फायदा घेत चोरांनी ८ ते १० शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारीच्या केबल्स चोरील्या या सर्व घटनांमुळे शेतकरी अगदी त्रस्त झाल्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी लोहारा व कासमपुरा परिसरातील शेतकरी करित आहे.