<
जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात राबवले जाणारे विविध उपक्रम
जळगाव दि. 18(प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे.त्या अनुषंगाने गावागावात स्वच्छता विषयक लोक चळवळ निर्माण व्हावी म्हणून विशेष मोहीम राबविण्यात यावी असे आवाहन मा.पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
गावागावात स्वच्छता रहावी, शौचालयाचा वापर व्हावा,जास्तीत जास्त गाव हागणंदारी मुक्त अधिक करणे आवश्यक असल्याने त्यासाठी विविध उपक्रम तालुका व गाव स्तरावर राबविण्यात यावे यात एक खड्डा शौचालायचे दोन खड्डा शौचालयात रूपांतर करणे,सिटीझन अप्लिकेशन द्वारे प्राप्त प्रस्तावांचा निपटारा करणे,शौचालय बांधण्यासाठी नागरीकांना प्रवृत्त करून अनुदान वितरीत करणे,सार्वजनिक शौचालाय बांधकामाचे उदघाटन करणे,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनची कामे पूर्ण करणे,गोबरधन प्रकल्प कार्यान्वित करणे,प्लास्टिक संकलन करणे,नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करून त्याचा वापर करणे,सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे निर्माण करणे आदी उपक्रमांचा सामावेश करून गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ग्रामस्थां पर्यंत हे उपक्रम पोहचविण्यात यावे असे आवाहन मा.पालकमंत्री यांनी केले असून या उपक्रमासाठी नियोजन करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व प्रकल्प संचालक स्नेहा कुडचे यांनी केले आहे.