<
सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगांव च्यावतीने युवा गट कार्यशाळा संपन्न
जळगांव-(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती युवा गट कार्यशाळा दि.०१ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय भवन, जळगांव येथे श्री. नरेंद्र डागर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, नेहरू युवा केंद्र, जळगांव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मा. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात दि.२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ०६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्वाण या कालावधीत समता पर्व – २०२२ साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत समता पर्व -२०२२ अंतर्गत अनुसूचित जाती युवा गट कार्यशाळेत ग्रामीण व तालुका पातळीवरील युवकांना “सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा” या विषयावर विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सदरील कार्यशाळेत माहिती देण्यात आली. यावेळी मंचावर श्री.योगेश पाटील सहायक आयुक्त, समाजकल्याण जळगांव, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, नाबार्ड श्री. श्रीकांत झांबरे, शास्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र श्री. किरण मांडवडे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कार्यक्रम समन्वयक श्री. राहुल संदानशिव, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. दर्शना पवार, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जिल्हा व्यवस्थापक श्रीमती. श्रुती चौधरी, महाराष्ट्र उद्योजकता केंद्र जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. विजय सैंदाणे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, श्री. युनूस तडवी बार्टी, आदी उपस्थित होते.
यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करून समता पर्व -२०२२ अंतर्गत अनुसूचित जाती युवा गट कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना श्री. योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगांव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना व युवकांसाठी विविध रोजगार संधी आणि उद्योजकता विकास याबाबत माहिती दिली. सदरील सदरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक श्री. नरेंद्र डागर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, नेहरू युवा केंद्र, जळगाव यांनी नेहरू युवा केंद्राचे विविध उपक्रम या विषयावर मार्गदर्शन करतांना युवकांनी उद्योजाकताची कास धरावी आणि देशाच्या विकासाठी हाथभार लावावा याबाबत युवकांना मार्गदर्शन केले. तसेच श्री.श्रीकांत झांबरे यांनी नाबार्ड अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन करतांना नाबार्डच्या विविध योजना व प्रशिक्षण याबाबत आपले मत मांडले. श्री. शास्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र श्री. किरण मांडवडे यांनी नैसर्गिक शेती व तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करतांना कृषी पूरक व्यवसायात मधमक्षिका पालन, कुकुटपालन इ. बाबत मत मांडले. श्रीमती. दर्शना पवार यांनी स्री-पुरुष सक्षमीकरण व वैचारिक प्रगल्बता या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. श्री. राहुल संदानशिव, श्रुती चौधरी, श्री. विजय सैंदाणे यांनी संबंधित विभागातील योजना व प्रशिक्षणांची माहिती दिली.
सदर कार्यक्रमात योग्य पद्धतीने युवकांनी गाव व तालुका पातळीवर शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय व दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. योगेश पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभाग प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित युवकांना कार्यक्रमांती कृषी विज्ञान केंद्र, जळगांव येथे अभ्यास दौरा घेण्यात आला असून कृषी क्षेत्रासंबंधी विविध प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका समन्वयक जितेंद्र धनगर यांनी केले तर आभार श्री. युनूस तडवी बार्टी, यांनी मानले.
तरी सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय अधिक्षक श्री.राजेंद्र कांबळे यांचे सह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व तालुका समन्वयक, समतादूत यांनी परिश्रम घेतले.