<
बाभोंरी-(प्रतिनिधी) – जी.प.शाळा बांभोरी प्रचा येथे बाल दिन ते बाल अधिकार दिन हा बाल अधिकार सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बालकांचे अधिकारांवर मोठया प्रमाणात लक्ष देण्यात आले.मैदानी बौद्धिक खेळ, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या तसेच मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन शाळा व समाजकार्य विभागाने केले.
या बाल अधिकार सप्ताह साठी जी.प.शाळा बांभोरी चे शिक्षक वृंद,कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,समाजकार्य विभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत यांनी अनमोल सहकार्य केले तसेच गावातील युवक-युवती पालकांनी व सर्व बालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन कार्यक्रम संपन्न केला.
या प्रसंगी बांभोरी प्रचा चे सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे,
समाजकार्य विभागाचे डॉ.दीपक सोनवणे,श्री.पाटील सर
जी.प शाळेतील शिक्षक श्री.रवींद्र सोनवणे सर,श्री.साळवे सर ,सौ. पाटील मॅडम
ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप कोळी,श्री.जगदीश नन्नवरे, श्री.अमोल नन्नवरे शिक्षिका-सौ.सविता बाविस्कर
तसेच कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,समाजकार्य विभागाचे सर्व सामाजिक कार्यकर्ते व पालकांची प्रमुख उपस्थिती होती.