Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सफल प्रीमियर लीगमध्ये सफल क्रेझी फाईव्ह, सफल स्ट्रायकर्स संघ विजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read


मुंबई दि.4 प्रतिनिधी – मुंबई वळाला रोड येथील जे. के. नॉलेज स्पोर्टस सेंटर ट्रर्फ येथे झालेल्या सफल प्रीमीयर क्रिकेट लीगमध्ये महिला संघ सफल क्रेझी फाईव्ह व पुरूष संघ सफल स्ट्रायकर्स संघ विजयी ठरले. दोघं संघांना मान्यवरांच्या उपस्थितीत चषक देऊन गौरविण्यात आले.
सस्टेनेबल ऍग्रो-कमर्शियल फायनान्स लिमिटेड (सफल) मार्फत आयोजित केलेल्या सफल प्रीमियर लीग च्या पारतोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी सफलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभाकर बोबडे यांची प्रमुख उपस्थितीती होती. त्यांच्यासह वित्त अधिकारी श्री. परेश शहा, क्रेडीट हेड श्री. सुमित कारखानीस, प्रशासकीय अधिकारी श्री. सुभाष अहिरे, लिगल हेड श्री. आकाश इंदुरकर, एसएमई हेड श्री. सुशांत पांडा, ऑपरेशन हेड श्री. रविराज बल्लाळ, विक्री विभागातील श्री. भास्कर चव्हाण, श्री. विनोद गांगुर्डे यांची उपस्थितीती होती.

सफल प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये एकूण दोन महिला संघ व चार पुरुष संघ सहभागी झाले. यावेळी त्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट प्रतिसाद दिला. संपूर्ण स्पर्धेमध्ये महिला स्पर्धकांमधून सफल क्रेझी फाईव्ह हा महिला संघ विजेता ठरला, तसेच पुरुष संघामध्ये सफल स्ट्रायकर्स हा संघ विजेता ठरला, तर सफल लिजंड संघ हा उपविजेता घोषित करण्यात आला. पुरूष गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री. आदर्श दिवाणी (मॅन ऑफ द मॅच), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्री. आनंद गुरप्पू तर महिला गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून उत्कर्षा साबळे (मॅन ऑफ द मॅच), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एचआर हेड विना कशेळकर ठरलेत. स्पर्धा समविचाराने, प्रेमभावाने आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये सफलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय श्री प्रभाकर बोबडे हे सुद्धा समाविष्ट झाले होते. सफल चे एच.आर विभाग व संपूर्ण सफल कर्मचारी यांनी प्राथमिकतेने व सकारात्मक दृष्टीकोनातून योगदान देऊन एक चांगला उपक्रम स्थापित केलेला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व पदाधिकाऱ्यांचे कौतूक प्रभाकर बोबडे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बांभोरी प्र. चा. येथे बाल अधिकार सप्ताह मोठया उत्साहात साजरा

Next Post

भडगाव ग्रामीण रुग्णालयात असुविधेबाबत तरुणांनी घेतले डॉक्टरांना सलाईनवर

Next Post

भडगाव ग्रामीण रुग्णालयात असुविधेबाबत तरुणांनी घेतले डॉक्टरांना सलाईनवर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo