<
पाचोरा -(प्रतिनिधी) – बहिणाबाईंचे काव्य म्हणजे निसर्गाचे वरदान आहे त्यात नदी,नाले, पायवाट, काटेरी झाड,पान, फुल,पशू पक्षी, जमीन,जुमलांचे वर्णन तसेच जोशी, पंचांग चालीरीती, भाऊ, बहीण, चुलता, मावशी आत्या यांच्या आठवणी , खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला,अरे रडता रडता,डोये भरले भरले,अरे संसार संसार, या माध्यमातून माहितीचा खजिना मिळाला.
असे अर्थपुर्णकाव्य अशिक्षित बहिणाबाईनी महाराष्ट्राला दिले म्हणून त्या ज्ञानपिठ होते,असे विचार संतोष महाजन यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मछींन्द्र जाधव होते. प्रथम बहिणाबाई चौधरीच्या स्मृति दिन निमित्ताने प्रा.सुरेश कोळी (भडगाव) यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे छोटेखानी कार्य क्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सुनिल नवगिरे, सुरेंद्र तांबे, जावेद देशमुख, घनश्याम करोशिया, उमेश माळी,जयेश कुमावत यश सुर्यवंशी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल नवगिरे यांनी व्यक्त केले.