<
जळगाव – (प्रतिनिधी) – भारता सारख्या लोकशाही देशात दडपशाहीच्या वापर करून सत्ता-संपत्तीच्या बळावर देशातील पत्रकार आणि मध्यामांची मुस्कटदाबी केली जात आहे. एनडीटीव्हीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे रविश कुमार यांनी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात परखड भूमिका घेतली आहे. देशातील लोकशाही मूल्यांच्या व संविधानाच्या रक्षणासाठी झगडणारा पत्रकार म्हणून रवीश कुमार यांची जगभरात ओळख आहे. देशातील शोषित-पिडीत-वंचित-अल्पसंख्याक-कष्टकरी-आदिवासी-दलित-मजदूर-स्त्रियां-बुद्धीजीवी-मध्यमवर्ग व बेरोजगार तरुणांचा आवाज बनून रवीश कुमार यांनी एक पत्रकार म्हणून अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. सत्ताधीशांची हातमिळवणी करून धनदांडग्या उद्योगपतींनी अशी परिस्थिती निर्माण केली की ज्यामुळे रविश कुमार सारख्या एका प्रामाणिक व जनवादी पत्रकाराला एनडीटीव्हीचा राजीनामा द्यावा लागला.
फासीवादी शक्ती आणि बड्या भांडवलदारांच्या दबावास बळी न पडता रवीश कुमार आणि स्वाभिमानाने आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केले. ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना समर्थन दर्शविण्यासाठी जळगाव येथील सर्व पुरोगामी संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी] सिविल सोसायटीचे सदस्य आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने Standing in Solidarity with Ravish Kumar या कार्यक्रमाद्वारे काव्यरत्नावली चौकात एकत्र येऊन रवीश कुमार पाठींबा दर्शविला.
या प्रसंगी जनक्रांति मोर्चा चे मुकुंद सपकाळे, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटिल,सुरेश पाटिल,राम पवार,संजय पाटील. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. लभाणे ,लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे,शिक्षक भारतीचे अजय पाटिल. सर, ,समाजवादी पक्षाचे रईस बागवान,काँग्रेस पक्षाचे मुक्तदीर देशमुख, एमआयएम’चे सय्यद दानीश, प्रा.देवेंद्र इंगळे, प्रा.सतीश पडलवार, प्रा.किर्ती सोनवणे, प्रा.ज्ञानोबा सोनटक्के सुधाकर पाटिल,फ़हीम पटेल , यांच्यासह असंख्य नागरिक युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य सदस्य अविनाश तायडे चंचल धांडे, तथागत सुरवाडे, वैशाली कोळी, विकास वाघ, अंकुश मेढे , अक्षय महाजन, दिनेश राठोड, कंचन पाटील, तुषार महाजन, मुकेश राठोड,प्रतीक झनके,सानिकेत सोये,साई कुलकर्णी, रोहन बोन्द्रे प्रतीक वारयानी, ऋषिकेश काळे ,धीरज पानपाटील, करण मालकर, निलेश लोहार, विजय पालवे, अजय मनुरे यांनी परिश्रम घेतले.