<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील हरे कृष्ण मंदिरात मन्यार खेडा गट क्रमांक 423 मंत्री पार्क येथे गीता जयंती पूर्ण उत्साहात साजरी करण्यात आली.या दिवसापासून आता पवित्र ग्रंथ भगवत गीता वाटप सुरू झाले. गीता जयंती निमित्त झेड पी कॉलनी मन्यारखेडा येथील नागरिकांच्या सहकार्याने नामकरण सोहळा पार पडला. झेड पी कॉलनीला आता हरे कृष्ण नगर असे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मण्यार खेडा फाट्याला भक्तीवेदांत स्वामी प्रभू पाद रोड, मण्यार खेडा असे नाव देण्यात आले आहे.
महामार्गालगतच्या नवीन फलकाचे उद्घाटन मन्यारखेडा सरपंच श्री. राजेंद्र पाटील श्री. पिंटू जी आणि परमात्मा दास प्रभू जी, इस्कॉन यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी हरे कृष्ण नगर व मन्यारखेडा येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थ सारथी प्रभू जी, इस्कॉन जळगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन परमात्मा दास प्रभू जी यांनी केले.कार्यक्रमाच्या संचालनासाठी संकर्षण देव प्रभू जी यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान इस्कॉन मंदिर जळगाव तर्फे प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमादरम्यान ज्योती श्रीवास्तव, वर्षा पाटील, कृष्णा श्रीवास्तव, शुभम त्रिवेदी, कदम प्रभू, हितेश जाधवानी, गौरव चौधरी, खडके प्रभू, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.