<
जळगाव दि.6 – के.सी.ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालया व्दारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगांव क्रीडा विभाग, आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट पुरुष व महिला स्पर्धा २०२२ ह्या स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत पुरुष संघांतर्फे मू. जे. महाविद्यालय, जळगांव विरुध्द के. सी. ई. आय. एम. आर., जळगांव व महिला संघांतर्फे मू. जे. महाविद्यालय, जळगांव विरुध्द पी. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. दोन्ही गटात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत अजिंक्यपद प्राप्त केले.
महिला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. सी.पी. लभाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नवनीत आसी, डॉ. सचिन झोपे, डॉ. आनंद उपाध्याय, डॉ. गोविंद मारतळे, प्रा. सतीश कोगटा, प्रा. एस.एम. वानखेडे, प्रा. जयंत जाधव, प्रा. नीलिमा पाटील, सौ. छाया चिरमाडे, प्रा. अमर हटकर उपस्थित होते. तसेच परुष क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालायचे कुलसचिव डॉ. जगदीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जुगलकिशोर दुबे, प्रा. किरण नेहेते, डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. योगेश महाजन, डॉ. चांदखान, प्रा. राहुल धुळणकर, अनिल चौधरी उपस्थित होते.
स्पर्धेचे निवड समिती सदस्य म्हणून डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. नवनीत आसी, व डॉ. आनंद उपाध्याय यांनी काम पहिले, स्पधेचे पंच म्हणून पंकज महाजन व योगेश महाजन यांनी काम पहिले.
सदर स्पर्धा ह्या मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शना खाली पार पडत आहेत. स्पर्धेचे तांत्रिक समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. पी. आर. चौधरी काम पाहत आहेत.