<
जळगाव – (प्रतिनिधी) – मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक व सामूहिक विवाह कक्ष च्या पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते,खान्देश मराठा कुणबी वधू वर परिचय ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष. गौरी उद्योग समूह वावडदा चे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.मराठा कुणबी समाजातील वधू वर संबंध जुळवण्याचे उत्कृष्ठ सामाजिक कामासाठी सुमित पाटील यांची सर्वत्र ख्याती आहे.कमी वयात मराठा समाजासाठी एक मोठे कार्य सुमित पाटील यांनी आतापर्यंत केले असून हजारो संबंध जोडले आहेत.
विनाहुंडा विवाह संबंध जोडण्यासाठी,कमी खर्चात विवाह होण्यासाठी,समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात तसेच जनजागृती करीत असतात.सामाजिक कार्यात देखील ते सतत पुढे असतात.अनेक सामाजिक संस्थेकडून त्यांना अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत.मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक व सामूहिक विवाह कक्ष च्या पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून सुमित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.