<
समाज चिंतामणी प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम
कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचा शताब्दी महोत्सव सुरू आहे.त्यानिमित्त शाळेत समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे भारत प्रज्ञाशोध प्रश्नमंजूषा हा उपक्रम दर आठवड्याला आयोजित करण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे ,यासाठी विविध पारितोषिके दिली जात आहे.त्यामुळे विद्यार्थी दिलेल्या विषयावर तयारी करून उत्स्फूर्तपणे स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. दर आठवड्याला कार्यक्रमाविषयी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दिसून येत आहे.नवोपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी लागल्याचे जाणवत आहे.
हितेश जितेंद्र महाले हा स्पर्धेचा प्रथम विजेता ठरला आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सिमरन बोरसे या विद्यार्थिनीने रोख चारशे रुपये पारितोषिक मिळवले आहे.
समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे गेल्या नऊ वर्षापासून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे,विविध वृत्तपत्रांचे वाचन करणे,अवांतर पुस्तकांचे व महापुरुषांच्या चरित्र ग्रंथांचे वाचन, सामाजिक जबाबदारीची जाणीव तसेच स्पर्धेच्या या युगामध्ये विद्यार्थ्यांना निर्भयपणे सामोरे जाण्यास सक्षम बनवणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
असा आहे प्रश्नमंजूषा नवोपक्रम
सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना एक विषय दिला जातो .त्या विषयावर विद्यार्थी आठवडाभर तयारी करतात. त्यानंतर पहिली फेरी घेतली जाते. त्यात सलग तीन प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाते.
त्यात एकूण सहा प्रश्न असतात.प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय असतात व योग्य उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नासाठी रोख पारितोषिक देण्यात येते.मदतीसाठी लाईफलाईनही आहे. विजेत्या विद्यार्थ्याला एक हजार रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह दिले जाते.
कार्यक्रमास कलाशिक्षक एस. डी. भिरुड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर ,उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस. पी. निकम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांचे सहकार्य प्रकल्प प्रमुख आर. डी. कोळी यांना मिळत आहे.