<
बोदवड – प्रतिनिधी-(राजेंद्र शेळके) – तालुक्यातील पाच गावांची निवडणूक आज संपन्न झाली. त्यात राष्ट्रवादीने भाजप व शिंदे गटाला फार मोठा धक्का दिला चार गावच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवत झेंडा फडकवला तर एका ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळवला.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपला गड राखला. बोदवड तालुक्यातील चिंचखेड, वडजी, निमखेड, धोनखेडा या चार ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने विजय मिळविला तर कोल्हाडी येथील ग्रामपंचायत वर काँग्रेस ने आपला झेंडा फडकविला. अशाप्रकारे महाविकास आघाडीने बोदवड तालुक्यात पाचही ग्रामपंचायतीवर आपली बाजी मारून भाजप व शिंदे गटाला खूप मोठा धक्का पोहोचविला. यामध्ये १)कोल्हाडी येथील काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री पुंजाजी दशरथ पाटील यांची लोकनियुक्त सरपंच पदी निवड करण्यात आली.
२) दोन खेडा येथील राष्ट्रवादीचे लोकनियुक्त सरपंचासाठी सौ. सौवैशाली सागर दांडगे यांची निवड झाली.
३) चिंचखेड येथील राष्ट्रवादीचे सौ. अक्काबाई नंदू पाटील यांची लोकनियुक्त सरपंच पदी निवड केल्या गेली.
४) निमखेड येथील राष्ट्रवादीचे लोकनियुक्त सरपंच श्री रमेश सुखदेव सुरंगे यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान भाजप शिंदे गटाला एकही जागा न मिळाल्याने आमदार एकनाथ खडसे व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष एडवोकेट भैय्यासाहेब पाटील यांनी बोदवड तालुक्यात आपले वर्चस्व कायम ठेवले.