Thursday, July 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“चार भिंती” चित्र प्रदर्शंनातून पद्मश्री भवरलालजैन यांना आदरांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read


जळगाव दि.23 प्रतिनिधी –येथील पु.ना.गाडगीळ अँड ज्वेलर्स आर्ट गॅलरीत जैन इरिगेशनचेसंस्थापक भवरलाल जैन यांच्या ८५व्या जन्मदिनाला समर्पित असलेल्या “चारभिंती” चित्रप्रदर्शंनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्तेकरण्यात आले होते. या प्रदर्शंनात खानदेशातील ज्येष्ठ चित्रकार प्राचार्य राजेंद्रमहाजन, प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर, चित्रकार विकास मल्हारा, चित्रकारविजय जैन यांच्या कलाकृतींचा समावेश आहे.

आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, प्राणी, फुले, झाडे, माणसे,समाज यांचे प्रतिबिंब याचित्रप्रदर्शंनातून आपल्याला बघता येते, यांसह हे सकारात्मक संदेश देणारे पण आहे असेप्रतिपादन उद्घाटक अशोक जैन यांनी याप्रसंगी केले. या प्रदर्शनाचे प्रास्ताविकशंभू पाटील यांनी केले. पु. ना. गाडगीळचे व्यवस्थापक संदिप पोतदार हे प्रमुख अतिथीहोते. हे प्रदर्शन दिनांक 30 डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्राचार्यएस.एस.राणे, कवी अशोक कोतवाल, अनिल जोशी, दीपक चांदोरकर, चित्रकार पिसुर्वोसुरळकर, श्याम कुमावत, सचिन मुसळे, सुशील चौधरी, तरुण भाटे, जेष्ठ कलाशिक्षक एल. झेड.कोल्हे, जितेंद्र चौधरी, योगेश सुतार, रूपाली सोनवणे, हर्षल पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालनज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. या प्रदर्शनातील राजेंद्र महाजन यांनी त्यांच्या चित्रातअंधाऱ्या रात्रीतील डोंगरदऱ्यांमधील भयाण निरवता, त्यांचे बोडखेपणाचाअनुभव मांडलेला आहे. त्यांच्या मनातील अस्वस्थता, तगमग, घुसमट ते या भव्य चित्रात परिणामकारकतेने सादर करत आहे. विकासमल्हारा यांचा पिंड काहीसा अबोल,एकाकीपण स्वीकारलेले  त्यांच्या चित्रात अमूर्त आकारांच्या राखाडीरंग योजनेतून आलेले दिसते. सगळेच आकार एकमेकांतून मिसळत रंगछटांच्या अलवारलेपनातून लय साधतांना दिसतात. त्यांची स्वधाटणीची पॅलेट आहे. उन्हाचे कवडसे, पांढऱ्या रंगाचा संयत वावर, घनदाटअंधार अवकाश, मंद झालेला प्रकाशझोत त्यांच्या या चित्रातूनझळकत राहतो. प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर हे नेहमीच  सामाजिक व्यथा-वेदना चित्रांत मांडतात, रसिकांना विचारप्रवण करतात. स्त्रीची वासल्यता आणिप्राणीमात्रांची ममता वेगळी नसतेच मुळी; तेच त्यांच्या या चित्रात आलेले दिसते.

अनुभवलेल्याजगण्याचा स्त्रोत काहीशा विरुपीकरण आकारांतून यांत ओघानेच बघावयास मिळतो. याचित्रातील घरांचे विखुरलेले आकार आणि स्त्रवलेली उत्कटता हृदयाचा ठाव घेते. चिंतनशीलचित्रकार विजय जैन यांच्या चित्रात ग्रामभाव विश्वातील बैलाची मुख संवेदना, त्यांचा कष्टमय प्रवास काही प्रमाणात अमूर्त आकारात मातीचारंग घेऊन आलेली दिसते.साधारीकरण हा त्यांच्या या चित्राचा स्थायीभाव आहे. याआगळ्या चित्रप्रदर्शंनाला जैन फार्मा फूड फ्रेशचे संचालक अथांग जैन, मल्हार कम्युनिकेशन्सचे आनंद मल्हारा, ललित कला अकादमी नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेलेहेमंत सूर्यवंशी, जिल्हा कलाध्यापक अध्यक्ष एन. ओ. चौधरी, सचिव अरुण सपकाळे,प्राचार्य अतुल मालखेडे, प्राचार्य जगदीश पाटील, प्रा.संजय नेवे, कलाशिक्षक भिका पाटील, कलाशिक्षक वसंतनागपुरे, कलाशिक्षक वाय.  आर. पाटील,चित्रकार जितेंद्र चौधरी, चित्रकार मनोज जंजाळकर इ.मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोण होणार अभ्यासार्थी? या अभिनव उपक्रमाचे आयोजन

Next Post

समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साने गुरुजींना अभिवादन…

Next Post

समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साने गुरुजींना अभिवादन…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications