<
ता. बोदवड – प्रतिनिधी – (राजेंद्र शेळके) – बोदवड तालुक्यातील जामठी येथे अवैध वृक्ष तोड झालेली असून त्यात सर्व गोल गोल बाबी आढळून आल्याचे दिसून येत आहे. ते असे की जामठी येथील शेतकरी यांनी आपल्या शेत बांधावरचे गट क्रमांक ५१ यातील फक्त कडुलिंबाचे ९९ झाडे तोडण्याची परवानगी वनपरिक्षेत्र मुक्ताईनगर येथील आर. ओ. पो कृपाली शिंदे मॅडम यांच्याकडून घेऊन शेतमालक अशोक सत्रे यांनी झाडे तोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट जामनेर येथील (स्वा मिल वाले) संजय कापडे व वाघारी येथील शेख बुडन शेख फकीरा यांना देण्यात आला.
दरम्यान हिंदू एकता संघाचे जिल्हाअध्यक्ष अनिल देवकर, माहिती अधिकार कार्यकर्ता तालुका अध्यक्ष चेतन तायडे, अमोल व्यवहारे, अर्जुन असणे यांनी जामठी येथील शेतकरी अशोक सत्रे यांनी विनापरवानगी अवैध वृक्ष तोडणी करण्याबाबत ची तक्रार त्यात गोंधन, बोर, चिंच, व आरायाचे झाडांची विना परवानगी अवैध कत्तल केल्याची तक्रार दि. २२/१२/२२ रोजी वनपरिक्षेत्र मुक्ताईनगर यांच्याकडे दिली होती. व २७/१२/२२ ला या सर्व बाबींची चौकशी करून विनापरवानगी वृक्ष तोडणारा वर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील अनिल देवकर, चेतन तायडे व संबंधित व्यक्तींनी वनविभाग मुक्ताईनगर कार्यालयात जाऊन अधिकारी मॅडम शिंदे यांच्याकडे स्मरण पत्र देत मागणी केली होती. तरी गुन्हे दाखल न केल्यास तक्रारदारांनी उपोषणाचा इशारा देखील दिला होता. परंतु वनविभागा तर्फे कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारदारांनी २९तारखेला वनपरिक्षेत्र मुक्ताईनगर कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
या प्रकरणात कुणाची किती सत्यता आहे यावर सर्व तालुका वाशी यांचे लक्ष लागलेले आहे.
याप्रकरणी शेतकरी अशोक सत्रे यांनी उपोषणकर्त्यावर बोदवड पोलीस स्टेशनला खंडणी मांगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अवैध प्रकारे झाडांची तोडणी झालेली असेल तर आम्ही कायदा ६४ (क)कलमनुसार संबंधित वृक्षतोड शेतकरी व संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करू…
वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे आर. ओ.पो मुक्ताईनगर.
मी दोन दिवस आजारी असताना माझ्या पश्चात झाडे नजर चुकीने परवाना नसलेली झाडे तोडली मी हे मान्य करतो व शासन मला त्याप्रकरणी जो काही दंड आकारेल तो मी भरण्यास तयार आहे अशी ग्वाही देतो.
शेतकरी अशोक सत्रे.