<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथिल जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन च्या योग स्पर्धा दिनांक1८आँगस्ट ला जाणता राजा ज्ञान व बलसाधना येथे संपन्न झाल्या होत्या.
राज्यस्तरीय योगासनस्पर्धेसाठी निवड झालेल्या वेगवेगळ्या गटातील खेळाडू 26 सप्टेंबर ते29 सप्टेंबर जिल्हा नगर तालुका कोपरगाव आत्मा मलिक ध्यानपीठ एज्युकेशनल स्पोर्ट्स कोकमठाण येथे संपन्न होत आहे हे सर्व योग खेळाडू जळगाव जिल्हा चे प्रतिनिधित्व करणार आहेत. ह्या सर्व स्पर्धकांना जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन चे अध्यक्ष माजी महापौर श्री.किशोर पाटील व सचिव तथा आंतरराष्ट्रीय पंच डॉ. अनिता पाटील ह्यांनी शुभेच्छा दिल्या . सर्व योग खेळाडूंसमवेत राष्ट्रीय पंच रुद्राणी देवरे,प्रतिभा सपकाळे व आंतरराष्ट्रीय पंच डॉ. अनिता पाटील.
निवड झालेला संघ खालिल प्रमाणे वयोगट ८ ते १० मुले व मुली १.अदिती पाटील २.समृद्धी वाणी ३.प्रसाद बविस्कर ,वयोगट १० ते १२ मुले व मुली १.नंदिनी दुसाने २.श्रद्धा पाटील ३.आर्या शर्मा ४.आदित्य सपकाळे ५.आर्य पवार, वयोगट १२ ते १४ मुले व मुली १.जानवी सोमाणी २.सृष्टी वाणी ३.यशश्री सपकाळे ४.आदित्य दुसाने.वयोगट १४ ते १६ मुले व मुली १.चेतना देवरे २.समृद्धी सपकाळे ३.निशु पाटील ,वयोगट २५ ते ३५ १.वर्षा शर्मा २.मिशीता मंधान ,वयोगट ३५ ते ४५ १.अर्चना महाजन २.ज्योती भांडारकर ३.निशा भगवान.