<
अमळनेर – दिनांक 3 जानेवारी 2023,) – पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. डॉ. श्वेता वैद्य या उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. अस्मिता सरवैया, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अनिता खेडकर कार्यालयीन लिपिक श्रीमती ज्योती सोनार हे व्यासपीठावर विराजमान होते.
मान्यवरांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करुन दिला. जयंती दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी निशिगंधा पाटील, दीपक विश्वेश्वर, नीता काटे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अनिता खेडकर व कार्यालयीन लिपिक श्रीमती ज्योती सोनार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि त्यावेळच्या परिस्थितीची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ श्वेता वैद्य यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनगौरव कार्याचा कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व उपस्थितांना सांगितली आज श्री स्वतःचा उद्धार केवळ शिक्षणामुळेच करू शकतील आणि हे शिक्षण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुळेच मिळाले म्हणून त्यांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून उपस्थित विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना युनिट, महाविद्यालयातील प्रा.डी आर ढगे, प्रा डॉ भरत खंडागळे, प्रा डॉ एस आर चव्हाण, प्रा. चंद्रशेखर बोरसे, कार्यालयीन अधीक्षक श्री अनिल वाणी, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी केली. निता काटे या विद्यार्थिनीने आभार व्यक्त केले.