<
२२ वा बालगंधर्व महोत्सव ५, ६, ७ जानेवारीला होणार
बालगंधर्व महोत्सवाच्या २१ आवर्तने अनूभवना-या रसिक श्रोत्यांचा गौरव
जळगाव दि.8 प्रतिनिधी -बालगंधर्व संगीत महोत्सवात आजच्या दिवसाची संध्याकाळ रम्य झाली रसिक स्वरोत्सवात न्हाऊन निघाले. कारण होते ज्येष्ठ गायक पंडीत डॉ. राम देशपांडे व त्यांच्या सौभाग्यवती अर्चना देशपांडे मुलगा गंधार देशपांडे यांच्या सहगायनाचे. पंडीत डाॕ.राम देशपांडेंनी आपल्या गायनाची सुरवात राग यमन कल्याणने केली. ताल तीलवाड्यात बंडा ख्याल “जिया मानत नाही” व द्रुत ख्याल तिनतालात ” ननदिके बचनुवा संह न जाये ” अत्यंत दमदार पणे सादर केले. त्यानंतर पंडितजीचा स्वरचित तराणा “देनी देनी देनी तनन” हा एकतालातील सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर पंडिता किशोरीताई अमोणकर यांनी गाऊन अजरामर केलेल्या ” बोलावं विठ्ठल, पहावा विठ्ठल” या अभंगला स्वतःची राग भिन्न षड्ज रागात बांधलेल्या चालीचा तोच अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असलेले आणि अजरामर झालेले सं. कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालेवर आधारित “सूरत पिया बिन छिन बिसराये” हे पद सादर करून रसिकांना तृप्त केले. पंडितजींनी आपल्या मैफिलीची सांगता कोण जागता कोण सोता या भजनाने झाला.
पं. कुमार गंधर्व यांची गाऊन अजरामर केलेल्या “सावरे ऐजैयो, जमुना किनारे मोरा गाव” या गीताने केली. आणि रसिकांच्या कानात हे सूर घुमत राहिले. त्यांना साथ संगत तबल्यावर रामकृष्ण करंबळेकर, संवादिनीवर अभिनय रवंदे, तानपु-यावर मयूर पाटील, वरूण नेवे यांनी केली.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. जाई काजळ हे आहेत. दोघंही सत्रात सहभागी कलावंताचा सत्कार जैन इरिगेशनचे डाॕ. अनिल पाटील, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, वेगा केमिकल्सचे भालचंद्र पाटील, निनाद चांदोरकर, दीपिका चांदोरकर, डाॕ. अर्पणा भट यांनी केले.
मोहन वीणा, सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने समारोप
बालगंधर्व संगीत महोत्सतील व्दितीय समारोपाच्या सत्रात पद्मभुषण व कॕनिडीयन ग्रॕमी ॲवार्ड विजेते पिता पुत्र पं. विश्वमोहन भट व पं. सलिल भट यांच्या मोहन वीणा व सात्विक वीणा यांच्या जुगलबंदीने झाले. सुरूवातीला पंडीतजींनी स्वरचित विश्वरंजनी रागामध्ये आलाप, जोड , झाला, विलंबीत तिन तालात व मध्य व द्रुत लय तिन तालात सादर करून रसिकांना एका वेगळ्या रागाची अनुभूती रसिकांना दिली. १९९० दशकात अमेरिकेमध्ये पंडीतजींनी एका अल्बमची निर्मिती केली त्यामध्ये असलेली रचना “अ मिटींग बाय द रिव्हर” या रचनेसाठी ग्रॅमी ॲवार्ड दिले गेले हा ग्रॅमी ॲवार्ड सर्वप्रथम भारतात आणण्याचा मान पं. विश्वमोहन भट यांना मिळाला. त्याचसोबत राग जोग मधील एक उत्कृष्ट रचना सादर केली. ही रचनासुध्दा ग्रॕमी ॲवार्डमध्ये समाविष्ट होती. पंडीतजींच्या मैफिलाचा आणि २१ व्य बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप दोन्हीही कलावंतांनी जुगलबंदीच्या माध्यमातून वंदे मातरम् ने केला. त्यांच्याबरोबर तबल्याची संगत युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे बडोद्याचे हिंमाशू महंत यांनी केले.
रसिक श्रोत्यांचाही झाला गौरव
बालगंधर्व संगीत महोत्सवात या २१ व्या आर्वतनाच्या माध्यमातून ज्या रसिक श्रोत्यांनी ही २१ आवर्तने उपस्थित राहून हा महोत्सव काना- मनात साठवला आहे, अशा रसिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुलकर्णी व विश्वस्त प्रा.शरदचंद्र छापेकर यांच्याहस्ते कृतज्ञता गौरव करण्यात आला. यात इंद्रराव पाटील, दिगंबर महाजन, सुदिप्ता सरकार, मेजर नाना वाणी, देविदास पाटील तसेच मायटी ब्रदर्सच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे मिलींद थथ्थे यांचाही सन्मान झाला.
२२ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ ला
आभार प्रदर्शन करताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी पुढील वर्षी बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ५, ६ व ७ जानेवारी २०२४ होणार असल्याचे जाहीर केले. तसेच याच महोत्सवाची एक मैफल ‘अभंगवाणी’ च्या माध्यमातून रविवार दि.१५ जानेवारी २०२३ ला महात्मा गांधी उद्यानात सकाळी ६.३० आयोजित करण्यात येणार असल्याची माहीत त्यांनी दिली.
सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले. गुरूवंदना मयूर पाटील यांनी म्हटली.