<
लोहारा ता पाचोरा( रिपोर्टर ईश्वर खरे) :
धी शेंदुर्णी सेंक एज्यु को-ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती युवकदिन म्हणून साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक आर के सुरवाडे होते कार्यक्रमास विशेष प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डब्ल्यू एस पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आर एस परदेशी पर्यवेक्षिका सौ यू डी शेळके जेष्ठ शिक्षक पी एम सुर्वे आर जी बैरागी एस एस गुजर वाय पी वानखेडे आर सी जाधव पी यु खरे एस बी सावकारे इ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कै आचार्य गजाननराव गरुड राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आर एस परदेशी यांनी केले त्यांनी राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयीची माहिती उपस्थितांना करून दिली विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा स्वरूपात राजमाता जिजामाता यांची वेशभूषा धारण करून आपली मनोगते सादर केली व विद्यार्थ्यांनी राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित आपले विचार मांडले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डब्ल्यू एस पाटील यांनी राजमाता जिजामाता ने शिवाजी राजांना कशाप्रकारे घडवलं व राजांनी स्वराज्य कशा प्रकारे निर्माण केलं याविषयी विद्यार्थ्यांना गोष्टीच्या स्वरूपात मार्गदर्शन केले विद्यालयाचे उपशिक्षक श्री बी एन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आर के सुरवाडे यांनी राजमाता जिजामाता यांनी शिवाजी राजांना कशाप्रकारे मार्गदर्शन करून घडवले हे उपस्थितांना सांगितले व स्वामी विवेकानंद यांच्या धार्मिक कार्याविषयीची माहिती उपस्थितांना करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एम शिरपुरे यांनी केले आभार आर सी जाधव यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.