<
प्रतापनगर येथे आय केअर व चष्म्यांचे दालन रुग्णांच्या सेवत
जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – नेत्ररुग्णांच्या खास सोयीसाठी बी ॲण्ड के संचलीत कांताई नेत्रालयाचे ‘ॲडव्हान्स आय केअर’, सुसज्ज अद्ययावत सेंटर तसेच चष्म्यांचे अत्यंत आधुनिक आणि भव्य दालनाचे शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. सुभाष चौधरी यांच्या ‘श्री क्लिनिक’ येथे गुरुवार १९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी 5.30 वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन होत आहे.
जळगाव शहरातील जुन्या हायवेवर जैन उद्योग समुहाच्या औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ जुन्या जैन फॅक्टरी या वास्तूपासून झाली आहे. त्या पावन जागेमध्ये सेवाप्रकल्प २०१६ ला कार्यान्वीत झाला. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन व त्यांच्या दिवंगत पत्नी सौ. कांताबाई जैन यांनी सेवेचा वसा व सामाजिक बांधिलकी मानून आयुष्यभर सामाजिक कार्य केले. याच उत्तरदायित्वातून कांताबाई यांनी नेत्रदानाचा संकल्प केलेला होता. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले व त्यांच्या डोळ्यांमुळे आज दोहोंना दिव्यदृष्टी लाभली, ते हे जग त्यांच्या नेत्रदानामुळे पाहू शकत आहेत. त्यांच्या या तळमळीला लक्षात घेऊन एकच छताखाली नेत्ररुग्णांचा इलाज होईल असे मल्टीस्पेशॅलीटी आय हॉस्पीटल शहरात उभारले गेले. या सात वर्षात कांताई नेत्रालयाने नेत्रदीपक कार्य केले.
कांताई नेत्रालयाने अवघ्या सात वर्षात आरोग्य क्षेत्रात मोठा लौकिक प्राप्त करून एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. २२ हजारहून अधिक शस्त्रक्रिया आणि सव्वा दोन लाखाच्यावर नेत्र तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. शिबिराच्या माध्यमातून जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील गरजू नेत्र रुग्णांपर्यंत कांताई नेत्रालय पोहोचले आहे.
कांताई नेत्रालयात डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या तपासण्या आणि उपचार, त्यावरील शस्त्रक्रिया अत्याधुनिक यंत्रणेसह गुणवत्तापूर्ण सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुंतागुंतीच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या महानगरांमध्ये न जाता कांताई नेत्रालयात यशस्वी उपचारासह होत आहेत. अतिशय क्लिष्ट रेटिना शस्त्रक्रियेची सुविधा येथे उपलब्ध आहे. कांताई नेत्रालयात सर्वप्रकारच्या नेत्रसेवा दिली जात असतानाच गोरगरिबांना सवलतीच्या दरात देखील शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जातात. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना अतुल जैन (एमबीबीएस, एम.एस., एफआरव्हीएस) या स्वत: रेटिना सर्जन आहेत. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. भावना जैन यांच्यासह डॉ. अमोल कडू (फेको व ग्लोकोमा सर्जन), डॉ. नितीन भगत (फेको व कार्निया सर्जन), डॉ. अंशु ओसवाल (कॅटरॅक्ट सर्जन, मायोपिया स्पेशालिस्ट), डॉ. इवानजिलीन राव (कॅटरॅक्ट सर्जन व जनरल ऑफथॅलमोलोजिस्ट) आणि डॉ. योगेग जायभये (कॅटरॅक्ट सर्जन व जनरल ऑफथॅलमोलोजिस्ट) असे तज्ज्ञ डॉक्टर्स कार्यरत आहेत. नेत्ररुग्णांसाठी सोईचे व्हावे या हेतुने शहरात “कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअर” या नवीन शाखेचा आरंभ होत आहे.
कांताई नेत्रालयाचे वैशिष्ट्ये –
मोतिबिंदू विभाग – (अत्याधुनिक सेंच्युरीअन गोल्ड मशिनद्वारे अतिसूक्ष्म छेद घेऊन २० मिनिटांहून कमी वेळात मोतिबिंदू पासुन मुक्तता), रेटिना विभाग – (ईंट्राव्हिट्रीयल ईंजेक्शन्स् लेझर्स व शस्त्रक्रिया), कॉर्निया विभाग – डोळ्यातील बबुळासबंधी उपचार व शस्त्रक्रिया, लहान मुलांमधील दृष्टीदोष निवारण विभाग – (तिरळेपणा, जन्मजात मोतिबिंदू, आळशी डोळा व इतर नेत्रदोष उपचार व शस्त्रक्रिया), मायोपिआ क्लिनीक, कॉन्टॅक्ट लेन्स् क्लिनीक, प्रशिक्षीत व अनुभवी ऑप्टोमेट्रीस्टस्, समुपदेशन विभाग, प्रत्येकाची कार्यपद्धत, गरज व वापर लक्षात घेऊन कस्टमाईज्ड चष्मा बनविण्याची सुविधा, सर्व प्रकारच्या औषधी उपलब्ध, डिजीटल मेडीकल रेकॉर्ड सिस्टीम, ऑनलाईन अपॉईन्टमेंटची सुविधा, कॅशलेस मेडिक्लेम असे खास वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.