<
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने दि. २४.०१.२०२३ रोजी राष्ट्रीय बालीका दिन व कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ कायदा २०१३ अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुख व कार्यालयाअंतर्गत अंतर्गत तक्रार निवारण समिती अध्यक्ष व सदस्य यांचेसाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमासाठी मा. विभागीय उपआयुक्त नाशिक श्री. चंद्रशेखर पगारे हे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.अप्पर जिल्हाधिकारी सोो. मा. प्रविण महाजन, मा. उप वनसंरक्षक श्री विवेक होशिंग, मा. उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीम. स्नेहा कुडचे, मा. अति. पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत गवळी, मा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री देवेंद्र राऊत मा. बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी श्री. विजयसिंग परदेशी, मा.प्रा. ॲङ डॉ. विजेता सिंग, मा. अध्यक्ष स्थानिक तक्रार समिती प्रा.सौ. उषा सपकाळे अधिनियमान्वये घोषीत मा. जिल्हा अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी पुर्नवसन श्री . रविंद्र भारदे, मा.उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीम. शुभांगी भारदे, मा. राज्य महिला आयोग जिल्हा समन्वयक श्री. पियुष गडे, तसेच जिल्हास्तरावरील कार्यरत स्थानिक तक्रार निवारण समितीचे मा. सदस्य अॅङ श्री. आशिष पाटील, सौ. शकुंतला अहिरराव, सौ. लिला कोसोदे, मा जिल्हा बाल विकास अधिकारी श्रीम. डॉ वनिता सोनगत उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीने महिलांना आदराचे स्थान दिले आहे. महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. असाच सन्मान प्रत्येक आस्थापनेने दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अन्वये प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी अशी सुचना मा. मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. प्रविण महाजन व अप्पर पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांनी सुचना दिल्यात. तसेच मा. उप वनसंरक्षक श्री विवेक होशिंग, मा. विभागीय उपआयुक्त नाशिक श्री. चंद्रशेखर पगारे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांना काम करण्यास पोषक आणि लैंगिक छळापासून मुक्त वातावरण मिळावे यासाठी कायद्यानुसार प्रत्येक शासकीय, अशासकीय, महामंडळे व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणेबाबत सुचना दिल्यात.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. श्रीम. वनिता सोनगत यांनी केली व राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्यसाधून महिला बाल विकास विभाग व युनिसेफ मार्फत जिल्हास्तरावर कार्यरत बालविवाह निर्मुलनाकरिता सक्षम प्रकल्प अंतर्गत बाल विवाह प्रतिबंध करणेबाबत जाणिव जागृतीसाठी पोष्टरचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मुलगी वाचवा-मुलगी शिकवा या अभियानात सहभागी होवून अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
सदर कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. श्रीम. विजेता सिंग मणियार विधी महाविदयालय, जळगाव यांनी कार्यालयात महिला सुरक्षित असाव्यात व तिला सन्मान मिळावा यासाठी विभाग प्रमुखांनी दक्ष असायला हवे तसेच कामाच्या टिकाणी स्त्रियांना काम करण्यास पोषक आणि लैंगिक छळापासून मुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे असे मत व्यक्त केले व पावर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमाने कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम २०१३ बाबत सादरीकरण करुन उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसण केले.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच अधिनस्त शासकीय संस्था, बालगृहे, निरिक्षण गृहे, वन स्टॉप सेंटर यांचे अधिक्षक व अधिक्षिका, संरक्षण अधिकारी, समुपदेशन केंद्रातील समुपदेशक, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.