<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील रक्षा अशोकचंद कांकरिया (सिसोदिया) यांना सुक्ष्मजीव शास्त्र विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कडुन नुकतीच पी. एच. डी. प्राप्त झालेली आहे. त्यांनी pseudomonas प्रजातीचे जीवाणू शोधून ते दुष्काळ, आम्ल, सामू व खार माती परिस्थितीत पण पीकाच्या मुळाशी राहून पोषण, नत्र स्थिर करतात व स्फुरद विघटन करतात.
सोबतच प्रतिजैविक तयार करुन टॉमॅटो, केळी, मुंग, वांग्यावर्ती प्रादुर्भाव करणारी Fusarium व भुईमुगावर आढळणारी Aspergillus flavus बुरशीजन्य रोगांपासून बचाव करतात.
त्यांनी DAPG चे बीज उपचार पद्धतीने वापरुन गहु, हरबरा, मुंग, शेंगदाणे याच्यात प्रभावी संशोधन केले. तसेच मुलाशी करतात या सोबतच शुंगा कलले. सिसोदिया) बहिणाबाई चौधरी उत्तर विदयापीठाच्या वतीने सुक्ष्मजीव उप्तन काळात प्रभाव विषयात पीच.डी. प्रदान. नविन बचाव करतात उपचार पद्धती वापरून शेंगदाण तसेच त्यांनी गहूवर शेतीप्रयोग करुन खार जमिनीत २८ % जास्त उत्पन्न मिळवले.
एवढेच नव्हे तर Corona काळात कोरोना विषाणू वर DAPG चा प्रभाव Simulation पद्धतीने अभ्यास केला व प्रभावी असलेल्याचे लक्षात आले. त्यांचे हे संशोधन आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे.
त्यांना या संशोधन कार्यासाठी डॉ. नवीन ददी व प्रा. अंबालाल चौधरी (Co-guide) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे, तसेच त्या ॲड. अजयकुमार सिसोदिया त्या पत्नी आहेत.