<
जळगांव – (दि. 23 फेब्रुवारी) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रायोजित आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय जळगाव येथे “युवा संसद” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सचिव धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, उद्घाटक माजी विधान परिषद आमदार विधीतज्ञ श्री. जयप्रकाश बाविस्कर, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल कुलकर्णी शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. राजेंद्र वाघुळदे, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगावचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी युवा संसद कार्यशाळा समन्वयक प्रा डॉ. शाम दामू सोनवणे , सहाय्यक महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ. सुनिता प्रमोद चौधरी हे मंचावर उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ. शाम सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतातून सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थांना भारतीय लोकशाहीचा कणा असलेली संसदीय कार्य प्रणाली प्रत्यक्ष अनुभवता यावी, त्यातून सुजाण आणि प्रगल्भ तरुण पिढी निर्माण व्हावी, त्यांनी देशाच्या लोकशाही आणि संसदीय प्रणाली मध्ये सुयोग्य राजकीय नेतृत्व करून देशाच्या लोकशाहीला अधिक मजबूत करावे. या करिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटकीय मनोगतात मा. जयप्रकाश बाविस्कर
यांनी संसदीय कार्यप्रणालीची माहिती दिली. तारांकित प्रश्न , अल्पकालीन चर्चा , लक्षवेधी हे हि आयुध सांगितली विद्यार्थी मित्रहो गुणांसाठी नाही तर लोकशाहीशी पाईक होण्यासाठी युवा संसदे मध्ये सहभाग होण्यासाठीचे आव्हान केले. तसेच स्थगित झालेली विद्यार्थी निवडणूक यापुढे सुरू झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच लोकशाही व समाजशास्त्र, नागरिक शास्त्र राज्यशास्त्र आदी विषयाचे अभ्यासक प्राध्यापक व विद्यार्थी यांनी निवडणुकी साठी मैदानात उतरले पाहिजे, असेही मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी आपल्या मनोगतात ज्या देशात लोकशाहीची मूल्ये रुजली आहेत. तो देश विकासाकडे वाटचाल करतो तर या उलट ज्या देशाच्या लोकशाहीमध्ये मूल्ये रुजलेली नसतात ती लोकशाही अधोगती कडे वाटचाल करते. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.डॉ. सुनील बाबुराव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आपला देश हा युवाशक्तीचा देश आहे.
आपल्या देशात राजकारणात युवाशक्तीचा सहभाग वाढावा या दृष्टीने ही कार्यशाळा महत्वाची आहे. ज्याला माणसे वाचता येतात, त्याला यश हे नक्की प्राप्त होत असते. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी आर चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगतात राजकीय अस्थिर परिस्थिती बदलायची असेल तर ज्ञानाचा सदुपयोग करून ती बदलवता येते. राजकीय आणि सामाजिक नीती मूल्यांना जोपासूनच परिस्थिती आपण स्थिर करू शकतो. त्यामुळे युवकांनो आपण आपले भविष्य ज्या क्षेत्रात आजमावणार आहात त्या क्षेत्रात काम करीत असतानां प्रमाणिक पणे काम करा सत्याचा मार्ग अवलंबवा जेणेकरून तुम्हाला यश नक्की मिळेल.
डॉ. अशोक हनवते यांचे समाजकार्य अभ्यासक्रमातील विद्यार्थीसाठी उपयुक्त ‘ क्षेत्रकार्य ‘ – प्रशिक्षण आणि समाजकार्याची कौशल्य या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुनिता प्रमोद चौधरी यांनी केले.
प्रथम सत्रात : – कला व वाणिज्य महाविद्यालय भालोद येथील प्रा.डॉ. सुनिल नेवे यांनी संसदीय कार्यप्रणालीच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडताना १) महाराष्ट्र विधी मंडळ चां इतिहास २) सभागृहाची सदस्य संख्या आणि मुदत अधिवेशन संस्थागित करणे आणि पुढील अधिवेशन संबंधी घोषणा ३) सदस्यांचा हजेरी पट आणि आसन व्यवस्था ४) नवनिर्वाचित सदस्यांचा शपथ विधी ५) पक्षांतरा च्या कारणा वरून निराऱ्हाता.६) अस्थायी अध्यक्षांची निवडणूक आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक ७) सभागृहातील गणपूर्ती (कोरम ) आणि राज्य पालांचे भाषण ८) सभागृहाची कार्यक्रम पत्रिका. ९) सभाध्यक्ष तालिका व चौकशी अहवाल १०) हरकतीचा मुद्दा आणि मानहानीकारक व अपमानास्पद अभिकथन , वैयक्तिक स्पष्टीकरणं. ११) मतमोजणी १२) महाधीवक्ता यांची विधी मंडळ सभा गृहातील उपस्थिती व त्यांची कायदेशिर मत जाणून घेणे. १३) विविध संसदीय आयुधे , प्रश्नउत्तरे १४) तारांकित प्रश्न १५) अल्प सुचना १६) अतारांकित प्रश्न १७) प्रस्ताव १८) लक्षवेधी सूचना १९) अर्धातास चर्चा हे संसदीय आयुध विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले..
द्वितीय सत्रात : –
पंकज महाविद्यालय चोपडा येथील प्रा डॉ. संजय पाटील यांनी युवा संसद कार्यशाळेत “संसदेच अभिरुप” निर्माण केले. संसदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती , पीठासन अधिकारी, मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेता , या विविध भुमिका वठवल्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण , महिलांची सुरक्षितता , विद्यार्थी परिषद निवडणुका , शेतकरी सुरक्षा कायदा विधेयक मांडले.
एकदिवसीय युवा संसद कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमास मंचावर धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालक प्रा. डॉ. विनय पाटील हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी कार्यशाळा समन्वयक प्रा डॉ. शाम सोनवणे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ. जुगल घुगे हे मंचावर उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमात चोपडा येथील अनिल बाविस्कर आणि अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी तेली फाईक मोहम्मद शफी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. शाम सोनवणे यांनी दिवसभरात कार्यशाळेतील अहवाल समारोप कार्यक्रम प्रसंगी सादर केला. संचालक डॉ. विनय पाटील यांनी आपल्या मनोगतात जग, देश, महाराष्ट्र, तुम्हाला समजून घ्यावयाचा असेल तर मित्रांनो तुम्ही संपादकीय लेख, अग्रलेख वाचवा जेणे करून तुमची वाचनीयमितता वाढेल आणि तुमचा शब्द संग्रह वाढेल. त्यामुळे युवकांनो तुमचे व्यक्तिमत्त्व फुलेल.
समारोपीय अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी विद्यार्थी विकास विभागांतर्गत ही “युवा संसद” कार्यशाळा प्रायोजित केलेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष आपण साजरे करीत आहोत. ९२ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत नोंदणी केलेली आहे. अभिरुप संसद कार्प्रणालीतील तुमचा उत्साह हा कौतुकास्पद होता. आमचा उद्देश सफल झाला मित्रहो आपल्या सर्वांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा आभार प्रदर्शन डॉ. जुगल घुगे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. कल्पना भारंबे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.