<
मुंबई, दि. 25 : कारागृहातील बंदी किशोर कन्हैयालाल भाटीया हे दि. 26 जुलै, 2019 रोजी मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 2.00 वा. करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई –400001 या ठिकाणी
या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.