<
जळगाव-(प्रतिनिधी )- येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) संघटन बांधणी करण्याचे काम अश्व गतीने सुरू आहे. मासू महाराष्ट्रभर तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी एक अराजकीय संघटना आहे. विद्यार्थी हित हेच एकमेव मासूचे अंतिम ध्येय आहे. आज विविध ठिकाणी शिक्षणासाठी लाखो रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागतात व तरीसुद्धा तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समाधानकारक योग्य शिक्षण मिळत नाही. असे प्रकार हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मासू कार्यरत आहे.
महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांनींच्या देखील अनेक समस्या समोर येतांना दिसत आहेत. अशा काही समस्या विद्यार्थीनींना उद्भवल्यास आमच्या महिला प्रतिनिधी यावर समयसूचकता बाळगुन काम करतील या अनुषंगाने संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. दिपक ए. सपकाळे यांच्या कडुन उत्तर महाराष्ट्र महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. पद्मकन्या डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या विविध पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र स्टूडेंट युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन विद्यापीठ कमिटी अध्यक्ष योगेश महाजन,उपाध्यक्ष प्रवीण देशमुख उपस्थित होते. ॲड. इंगळे यांनी मार्गदर्शन केले तर योगेश आणि रोहन महाजन यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. दिपक सपकाळे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करून समारोप केले.