<
अखेर मोदी सरकारने डाव साधला; राजकीय सूड उगवला.
सुरत न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर २४ तासांत लोकसभा सचिवालयाने निर्णय घेतला.
देशभरात संताप; ठिकठिकाणी उग्र निदर्शने, काँग्रेसची ‘डरो मत’ मोहीम
नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) – अखेर मोदी सरकारने राजकीय डाव साधला आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकीच रद्द केली. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर खासदार वा आमदाराला दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाली तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर चोवीस तासांच्या आत लोकसभाध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. ज्या तत्परतेने ही कारवाई झाली त्याबद्दल आता सर्वच विरोधी पक्षांनी संशय व्यक्त केला असून, भाजप आणि मोदी सरकारच्या या राजकीय सूडनाट्याचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, राहुल यांची खासदारकी रद्द केल्याने देशभरात संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून विकठिकाणी निदर्शने केली.
शरद पवार काय म्हणाले-
सर्वांनी एकत्र उभे राहण्याचे गरज राहुल गांधी आणि काही महिन्यांपूर्वी फैजल यांना लोकसभेचे खासदार म्हणून पात्र ठरवणे हे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे विरोधात आहे येथे लोकशाही मूल्यांना छेद दिला जात आहे हे निषेधार्थ आहे आपल्या लोकशाही संस्थांचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन राहण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली
2019 मधील ते वक्तव्य-
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकात बोलताना सर्व चोरांचे आडनाव मोदी का ?असे वक्तव्य केले होते कर्नाटकातील त्या वक्तव्यवृत्तात गुजरातमधील भाजपचे आमदार पोलीस मोदी यांनी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती गुरुवारी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोष ठरवताना दोन वर्षाचे शिक्षक झाले आणि तीच दिवसांचा जामीन हे दिला.
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर आले. मोदी सरकारकडून राहुल यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहेत.लोकसभेत आम्हाला बोलू देत नाही माईक बंद केला जातो. असा आरोप राहून यांनी थेट ब्रिटनमध्ये खासदारांसमोर केल्याने भाजप अधिकारी संतपले.
राहुल गांधी-
देशाचा आवाज बुलंद करण्यासाठी मी लढत आहे त्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे