Monday, December 8, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंदिरात सापडली २ हजार मेंढ्यांची मुंडकी; सगळी रांगेत मांडलेली; प्राचीन अवशेषांचं रहस्य काय?

Desk Team by Desk Team
27/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

इजिप्तमधील मंदिरात २ हजार मेढ्यांची मुंडकी आढळली आहेत. उत्खननादरम्यान संशोधकांना प्राण्यांचे अवशेष सापडले. यामध्ये कुत्रे, बकऱ्या, गाय, हरणांच्या मुंडक्यांचा समावेश आहे.

March 27, 2023

कैरो: इजिप्तमध्ये २ हजारांपेक्षा अधिक मेंढ्यांची मुंडकी सापडली आहेत. त्यामुळे संशोधक बुचकळ्यात पडले आहेत. इजिप्तचे राजा फिरोन रामसेस द्वितीयच्या मंदिरात मेंढ्यांची मुंडकी सापडल्याची माहिती पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयानं दिली. मंदिरात कुत्रे, बकऱ्या, गाय, हरणं आणि मुंगूसांच्या डोक्याचे अवशेष संशोधकांना सापडले आहेत.
दक्षिण इजिप्तमधलं एबिडोस शहर मंदिरं आणि मकबऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातील पुरातत्त्व तज्ज्ञांच्या एका पथकानं शहरात उत्खनन केलं. मेंढ्या आणि अन्य प्राण्यांची मुंडकी राजा फिरोन रामसेस द्वितीयला प्रसाद रुपात अर्पण करण्यात आली होती, असं संशोधकांनी सांगितलं. समीह इस्कंदर यांनी संशोधन करणाऱ्या पथकाचं नेतृत्त्व केलं

फिरोन रामसेस द्वितीयच्या मृत्यूनंतर त्यांच्या मंदिरात प्राण्यांची बळी दिले जायचे. त्यासाठी मेंढ्यांचा सर्वाधिक वापर केला जायचा. प्राचीन इजिप्तमधील जनता आपल्या राजाला प्रसाद रुपात प्राण्यांचा बळी द्यायची. दुसऱ्या रामसेसनं इसवी सन पूर्व १३०४ ते १२३७ अशी जवळपास ७० वर्षे इजिप्तवर राज्य केलं,’ असं इस्कंदर यांनी सांगितलं.
या संशोधनामुळे दुसऱ्या रामसेसचं मंदिर आणि इसवी सन पूर्व २३७४ ते २१४० या कालावधीत झालेल्या बांधकामापासून इसवी सन ३२३ ते ३० दरम्यान झालेल्या घडामोडींबद्दल लोकांना अधिक माहिती मिळेल, असं इजिप्तचे पुरातन अवशेषांच्या सर्वोच्च परिषदेचे प्रमुख मुस्तफा वजिरी म्हणाले. जनावरांच्या अवशेषांसोबतच पुरातत्त्व तज्ञांना जवळपास ४ हजार वर्षे जुन्या महालाचे अवशेष सापडले आहेत. या महालाची भिंत तब्बल ५ मीटर (१६ फूट) जाड आहे. या संशोधनादरम्यान अनेक मूर्ती, प्राचीन वृक्षांचे अवशेष, चामड्याचे कपडे आणि चपला सापडल्या आहेत.
एबिडोस शहर काहिराच्या दक्षिणेला नाईल नदीपासून ४३५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणची मंदिर आणि मकबरे प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा इजिप्तच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. इजिप्तमध्ये सातत्यानं पुरातत्व उत्खनन सुरू असतं. यामधून प्राचीन अवशेष सापडतात. त्याचा फायदा पर्यटन वाढीस होतो. इजिप्तच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा १० टक्के आहे. यामुळे २० लाख लोकांना रोजगार मिळतो.

Desk Team

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भाजपचं आठ नऊ वर्षातील प्रत्येक पाऊल ओबीसीविरोधी,त्यांच्याकडून ओबीसी प्रेमाची नौटंकी सुरु, हरी नरकेंचा आरोप

Next Post

पांढऱ्या सोन्याच्या दरात चढ उतार सुरु, विदर्भाच्या कापूस पंढरीत तुरीच्या दरात तेजी, बाजारभावात मोठी वाढ

Next Post

पांढऱ्या सोन्याच्या दरात चढ उतार सुरु, विदर्भाच्या कापूस पंढरीत तुरीच्या दरात तेजी, बाजारभावात मोठी वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d