<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील खुबचंद सागरमल विदयालयात राष्ट्रीय हरित सेना व भरारी फाऊंडेशन तर्फे शालेय परिसरात विखुरलेल्या प्लॉस्टीक कॅरीबॅग, रॅपर, बाटल्या असे ८किलो प्लास्टीक हरित सेना विदयार्थी व शिक्षकांनी संकलीत केले. संकलीत प्लॉस्टीक कचरा हा पुर्नवापरासाठी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातुन नवजीवन सुपर शॉप येथे जमा केल्यानंतर त्या बदल्यात कापडी पिशव्या मिळणार आहेत. मुख्यध्यापक सतिश साळुंखे यांनी प्लॉस्टीकचे दुष्परिणाम विदयार्थाना सांगीतले. या उपक्रम प्रसंगी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, हरित सेना प्रमुख प्रविण पाटील,पकंज सुर्यवंशी,विजय पवार व हरित विदयार्थी उपस्थित होते.या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक शेख, वनक्षेत्रपाल पी टी वराडे,सुनिल वाणी, सजंय बडगुजर व भरारी फाउंडेशनचे दिपक परदेशी व अक्षय सोनवणे यांचे सहकार्य लाभले.