<
जळगाव(प्रतिनिधी)- आधुनिकतेच्या साल २०१९ च्या विकासात्मक प्रगतीकडे जाणाऱ्या, या महाराष्ट्र सरकारात जवळ जवळ ६० टक्के निधी हा जळगांव जिल्हा महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या खात्यात शासन निर्णयानुसार वर्ग करण्यात आला आहे. त्यातुन जिल्हाभरातील विविध कामावर हा निधी वेळेत खर्च करणे आवश्यक आहे.
गेल्या सत्तातरात जिल्ह्यातील काही बराच निधी नियोजना अभावी व राजकीय चढा ओढी पायी वेळीच खर्च न केल्याने परत गेला. याची झळ काही अंशी स्थानिक नेत्यांना,पुढाऱ्यांना,व्यावसायिकांना बसली आणि त्याही पेक्ष्या जास्त झळ ही जिल्ह्यातील समस्त जनतेला,व त्यांच्या विकासात्मक धोरणांवर बसली .
तसेच जळगावचा विकास हा कागदावरच राहिला,याला जबाबदार जिल्हा परिषद,महानगरपालिका, चे भ्रष्ट नोकर,पदाधिकारी,आणि तुमच्या आमच्या सारख्या बुद्धिजीव पण मृत समान राहणारी लोकं, हातावर घडी तोंडावर बोट असणारे पुढारी ,समाजेसेवी,व शिक्षित लोक होय. रस्ते,आरोग्य ,उद्योगधंदे,व्यवसाय,व शेती तसेच शिक्षनिक धोरणावर भ्रष्ट कार्य झाल्याने,वरील सर्व मुद्यावर जिल्ह्यात सामान्य नागरिकाला मुकावे लागत आहे, आणि वाढलेली बेरोजगारी, चोऱ्या चपाट्या, आपसी वाद, राजकीय झगडे, खून आदी चव्हाट्यावर येत आहे हे याचेच पडसाद आहे हे म्हणणे वावगे ठरू नये असे देखील पालवे यांनी प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले.