<
जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव च्या वतिने मनपाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्षात आणून दिले की मागील दहा वर्षापासून घनकचरा प्रकल्प बंद आहे, त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे, मोठ्या प्रमाणात ढिग तयार झालेले आहे, त्यामुळे तेथील रहिवाशांना खूप असह्य त्रास होत आहे. जर सदर ठिकाणी घनकचरा प्रकल्प चालू करण्यात आला तर तो कचरा साठणार नाही आणि वास आणि घाण होणार नाही रहिवाशांना त्रास होणार नाही व दुर्गंधीही पसरनार नाही अशा आशयाचे निवेदन जळगाव मनसेच्या वतिने देण्यात आले आहे.
महानगरपालिका जळगाव यांच्यातर्फे यापुर्वी २००७ मध्ये हंजीर बायोटिक पुणे यांना घनकचरा प्रकल्पाचा ठेका दिलेला होता, त्या कंपनीने २००७ ते २०१३ पर्यंत हा प्रकल्प चालू ठेवला त्यानंतर तो २०१३ पासून २०२३ पर्यंत हा ठेका बंद असून. तरी आपणास निदर्शनास आणून देतो की हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून तो चालू झाल्यास नागरिकांची ही गैरसोय होणार नाही व महानगरपालिकेचे उत्पन्नात वाढ सुद्धा होईल, म्हणून हा घनकचरा प्रकल्प तातडीने चालू करण्यात यावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आपणास आग्रहाची विनंती आहे. कृपया याचा पाठपुरवठा करून लवकरात लवकर घनकचरा प्रकल्पाचा नियोजन करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव तर्फे तीव्र व आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जळगाव मनसेच्या वतिने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.