<
शिवराम पाटील यांच्या नावाची जळगाव शहरासह ग्रामीणमध्येही चर्चा
जळगाव-(विशेष प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी लोकप्रतिनिधी व मतदारांचे डोळे उघडावे असे काही सविस्तर सडेतोड खडेबोल स्पष्ट मत मांडलेले आहे. बघुयात काय म्हणताय सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील. श्रीराम पुरस्कृत राजकीय पक्षांच्या धुरंदरांनी जळगाव ग्रामीण मतदार संघाचे बौद्धिक, नैतिक पतन केलेले दिसते. जसे अमळनेर मतदार संघात कोणीही यावे, पैसे फेकावेत आणि निवडून यावे. एकेकाळी हा मतदारसंघ आमदार गुलाबराव पाटील यांच्या नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. तो आज सेलेबल स्टेटस ला आलेला आहे. कोठूनही, कोणीही यावे आणि अमळनेरचे आमदार व्हावे.
तसाच जळगाव ग्रामीण मतदारसंघ ही क्रिमिनल स्टेटस ला पोहचलेला आहे. म्हणून उठसूठ कोणीही अवैध धंदे करावेत आणि मतदारांना फक्त जेवणावर विकत घ्यावे. असा समज दृढ झालेला दिसतो. पांच दहा वर्षे अनेक धंद्यातून पैसे कमवावेत. पाच-सात बोकड एकत्र शिजवावेत. लोकांना खाऊन-पिऊन तर्र करावे. खुशाल निवडून यावे. पुन्हा पांच वर्षे गायब व्हावे. पुन्हा उगावे. व्वा! काय युक्ती आहे? काय संस्कृती आहे?
याला फक्त असे श्रीराम संस्कृतीवाले उमेदवार जबाबदार नसून मतदारांची अल्पसंतुष्टी, लघुविचारशक्ती ही कारणीभूत आहे. त्याची डाक्युमेंटरी फिल्म नुकतीच पाळधीला उतरवली गेली , म्हणे हे फक्त ट्रेलर आहे. सिनेमा बाकी आहे. रावणाने “जय श्रीराम” नारा दिला तर येथे सहज आमदार, खासदार निवडून येऊ शकतो. आख्खे रामायण येथेच उलटे घडते. म्हणून धरणगाव तालुक्यातील सर्वाधिक अनुदान सीईओ, बीडीओ,ग्रामसेवक पर्यंत आटून जाते. शेतकरी पर्यंत पोहचतच नाही. याची अनेक उदाहरणे उघडकीस आलेली आहेत. सरपंच, ग्रामसेवक, बीडीओ वरील अपहाराच्या कारवाईत ग्रामविकास मंत्री मात्र गब्बर झालेले आहेत. वरील विवेचन त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविले आहे. जनतेचे नक्कीच डोळे उघडतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. शिवराम पाटील नेहमीच जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात. शिवराम पाटील यांच्या सारखा कर्तव्यदक्ष अभ्यासू व प्रशासकीय यंत्रणेचा अभ्यास असलेला आमदार असला पाहिजे अशी चर्चा आता जळगाव सह ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.