<
जळगाव दि.19 – के. सी. ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय जळगाव येथे बीज इंटेल २०२३ कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक संजय पावडे हे होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी मॅनॅजमेन्ट गेम्स, वादविवाद स्पर्धा,प्रश्न मंजुषा, लोगो डिसाईन, अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापक किरण पाटील, सोनिया टेकवानी, ममता दहाड आणि पराग नारखेडे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी धुळे, जळगाव, भुसावळ, धरणगाव येथील महाविद्यालयाच्या एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य श्री. संजय दहाड, अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. हर्षा देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशासाठी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शेफाली अग्रवाल याच्यासोबत व्यवस्थापन विभागातील डॉ. विना भोसले, प्रा. दिगंबर सोनवणे, प्रा. हेमंत धनंधारे, प्रा. तानिया भाटिया, प्रा. आरती लुल्ला, प्रा. गुंजन चौधरी यांनी परिश्रम घेतले.