<
जळगाव – (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय जळगाव यांच्या च्या वतीने १ एप्रिल ते १ मे २०२३ दरम्यान “सामाजिक न्याय पर्व ” जळगाव जिल्ह्यात सहायक आयुक्त योगेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असुन त्या अंतर्गत आज दिनांक २७/०४/२०२३ रोजी अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जेष्ठ नागरिकांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुले-शाहु-आंबेडकर माल्यार्पण करुन करण्यात आले. तदनंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयाचे सहायक लेखाधिकारी मा.मनिषा पाटील यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक नायब तहसीलदार श्रीमती प्राजक्ता केदार यांनी जेष्ठ नागरिक कायद्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.दिपक पाटील यांनी जेष्ठ नागरिकांनी आरोग्य बद्दल घ्यावयाची काळजी व वाढत्या वयातील समस्या यावर विस्तृत स्वरूपात विवेचन केले त्यानंतर प्रमुख पाहुणे फेस्काम चे प्रादेशिक अध्यक्ष श्री.जगतराव पाटील यांनी जेष्ठ नागरिकांनी जीवन जगण्यासाठीच्या सकारात्मक पैलूंची उजळणी केली तसेच मंचावर उपस्थित फेस्काम चे माजी अध्यक्ष व जळगाव जिल्हा जेष्ठ नागरिक संयत्रण समीतीचे सदस्य श्री. दत्तात्रय चौधरी, समाज कल्याण निरिक्षक महेंद्र चौधरी, एस.आर.पाटील, अरूण वाणी, अभय डोलारे, सतीस सोनवणे, विशाल वसतकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले. तर आभार तालुका समन्वयक किशोर माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका समन्वयक, समतादूत प्रकल्प अधिकारी व समतादूत यांनी प्रयत्न केले.