Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘भाकरी फिरवायची वेळ आली’ या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला ‘हा’ खुलासा…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/04/2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘भाकरी फिरवायची वेळ आली’ या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला ‘हा’ खुलासा…

पुणे- शरद पवार बरीच वर्षे राजकारणात आहेत, त्यांनी अनेकवेळा भाकरी फिरवण्याचे काम केले आहे.तरुणांच्या मेळाव्यात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावू नका, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. पंतप्रधानपदासारख्या किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तींवर टीका करताना संयम बाळगायला हवा, असे मत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या टीकेवर व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सभागृहात पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, विकासकामे किंवा कोणताही प्रकल्प उभा करताना तिथल्या स्थानिक लोकांचा प्राधान्याने विचार करायला हवा. बारसूमधील प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मीही बोललो आहे. तिथल्या लोकांचा कोणत्या गोष्टीला विरोध आहे हे त्यांना विचारा, असे मी सामंत यांना सांगितले. तिथे जाण्याचा मी अद्याप विचार केलेला नाही, मात्र वेळ पडली तर जाईल.

नेत्यांवर टीका करताना ती सभ्य भाषेत केली जावी. काहीही बोलणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. मोठ्या पदांवरच्या व्यक्तीबद्दल टीका करताना शब्दाचा विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.बॅनर लावून कोणाला मुख्यमंत्री होता येणार नाही. त्यासाठी १४५ ही मॅजिक फिगर लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती युक्तीने मिळविली व ते मुख्यमंत्री झाले. खासदार डॉ. अमोल कोल्हे आमदार जयंत पाटील चांगले मुख्यमंत्री होतील, असे म्हणत असतील तर ते त्यांचे मत आहे.

मी पालकमंत्री असताना कोणतीही बैठक वेळेवर सुरू होत असे. सकाळी ७ वाजताही मी बैठका घेतल्या आहेत. कालवा समितीच्या बैठकीत मला आधी सकाळी १० वाजता सांगितले, नंतर मग ११ व परत १२ वाजता बैठक होईल, असा निरोप आला. मला त्याचदिवशी दुपारी पवारसाहेबांबरोबर बैठक होती, असे अजित पवार यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

आदित्य ठाकरेंनी आजारपणाचा फायदा घेत मुख्यमंत्री पदासाठी षडयंत्र रचलं; ‘या’ नेत्याने केला धक्कादायक दावा

Next Post

राज्य शासनाने आणलेल्या योजनेतून शेतकऱ्यांना वीज मिळणार तर बेरोजगारांना रोजगार….

Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

राज्य शासनाने आणलेल्या योजनेतून शेतकऱ्यांना वीज मिळणार तर बेरोजगारांना रोजगार....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo