इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना देखील सदर संस्थेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे.या होणार भरती- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल्स मेट्रोलॉजी पुणे या संस्थेत सेक्शन ऑफिसर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता- या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा पदवीधर असावा तसेच सदर उमेदवाराकडे 5 वर्षांचा प्रशासकीय/कायदे/खरेदी आणि स्टोअर्सचा अनुभव असावा. (शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतील पदाशी संबंधित ज्यातील किमान 3 वर्षे पर्यवेक्षी श्रेणीत असणे आवश्यक आहे).एवढी पदे भरली जाणार- या पदाच्या चार रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
अर्ज करण्याची पद्धत- या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. https://www.tropmet.res.in/Careers या लिंक वर जाऊन उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.
अर्ज करण्याची मुदत- 15 मे 2023 पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.